पदमश्री सिंधुताई सपकाळ यांचा दशक्रिया विधी ,टाकळीभान येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला
-
टाकळीभान प्रतिनिधी- अनाथांची माय असलेल्या थोर सामाजिक कार्यकर्त्या पदमश्री सिंधुताई सपकाळ यांचा दशक्रिया विधी ,टाकळीभान येथे ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला असून, श्रद्धांजली अर्पण करण्यात आले आहे
- माईंचा जीवनात अत्यंत खडतर प्रवास करून अनाथांची माय झालेल्या थोर सामाजिक कार्यकर्त्या पद्म सिंधुताई सपकाळ यांच गेल्या दहा दिवसांपूर्वी निधन झाले आहे. अनाथांना शेवटच्या श्वासापर्यंत छत्र देणाऱ्या माईंच्या निधनाने टाकळीभान गावावर शोककळा पसरली आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी माईंनी टाकळीभान गावाला भेट देवून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले होते. यावेळी परीसरातील हजारो ग्रामस्थांनी माईंचे दर्शन घेतले होते.
टाकळीभान व परीसरातील नागरिकांच्या या आठवणी ताज्या आसतानाच माईंचे निधन झाल्याने परीसरात शोक व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळेच समाजासाठी आख्ख आयुष्य समर्पित करणाऱ्या या थोर समाजसेविकेचा विधिवत दशक्रीया विधी टाकळीभान येथील महादेव मंदिराच्या परीसरात आज गुरुवार दि. १३ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता करण्यात आला,
यावेळी सकाळी ८ वाजता तऱ्हाळ महाराज यांचे प्रवचन करण्यात आले, तर तंटामुक्त गाव समितीचे उपाध्यक्ष विलास बाळासाहेब सपकाळ हे माईंचा पिंडदान विधिचा कार्यक्रम करण्यात आला . तरी परीसरातील ग्रामस्थांनी करोनाचे नियम पाळून माईंना श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी अशोक चे माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंखे ,लोकसेवेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, उपसरपंच कानोबा खंडागळे, शिवसेनेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब कोकणे, शिक्षण समितीचे अध्यक्ष गणेश कोकणे, पांडू मगर सुनील बोडखे, मच्छिंद्र कोकणे, बंडू नागले भाऊसाहेब पठारे ,बाळासाहेब दुधाळे ,व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,श्रीरामपूर प्रतिनिधी
- दिलीप लोखंडे
- 9767424802