टाकळीमिया येथिल ग्रामसभेत आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्यांला झालेल्या मारहाणीच्या
टाकळीमिया येथिल ग्रामसभेत आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्यांला झालेल्या मारहाणीच्या
टाकळीमिया येथील ग्रामसभेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा बरोबर इतर महापुरुषांचे पुतळे बसवा अशी मागणी आरपीआयच्या महिला पदाधिकार्यांनी केली होती मात्र या ठिकाणी एका व्यक्तीने महिलेला अपशब्द वापरले त्यानंतर वाद झाला आणि तेथे महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाली त्यानंतर महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्यानंतर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला.टाकळीमिया गावात आरपीआयच्या वतीने शिवाजी महाराजांचा पुतळा उभरण्याची तयारी आहे. परंतू येथिल ग्रामस्थांनी फुले, शाहु, साठे,आंबेडकर यांचे पुतळे उभारावे आणि गावात झालेल्या दोन समाजातील वाद सामंजस्याने मिटवावे.खोटे गुन्हे दाखल करुन समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रकार वेळीच थांबले पाहिजे.अशी मागणी आर पी आय चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी केली.
टाकळीमिया येथिल ग्रामसभेत आरपीआयच्या महिला पदाधिकाऱ्यांला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता.देवळाली प्रवरा येथुन मोटारसायकल रँलीने राहुरी बस स्थानक येथुन मोर्चात आलेले सहभागी झाले.बस स्थानका पासुन घोषणा देत पोलिस ठाण्यावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी सुरेंद्र थोरात म्हणाले की, टाकळीमिया ग्रामसभेत त्या महिलेने शिवाजी महाराजांबरोबर फुले, साठे, आंबेडकर यांचे पुतळे उभारण्याची मागणी केली.त्या महिलेस भर ग्रामसभेत तु बोलू नको असे सांगितले.तरीही ती महिला ग्रामसभेत बोलली त्यामुळे दोन चार समाजकंटकांनी त्या अबला महिलेला मारहाण केली. या घटनेचा आरपीआयच्या वतीने जाहिर निषेध करण्यात येत आहे.महिलेवर हात टाकणारे खरंच शिवाजी महाराजांचे मावळे आहेत का? असा प्रश्न थोरात यांनी केला. विद्यमान मंञी शंकरराव गडाख यांच्या सांगण्यावरुन जिल्हा पोलिस अधिक्षक यांनी नेवासा येथिल आरपीआयचा कार्यकर्ता रवि भालेराव यास तडीपार केले.श्रीरामपूरचे पोलिस निरीक्षक संजय सानप यांनी रविवारी राञी मागासवर्गीय समाजावर खोटे गुन्हे दाखल केले.टाकळीमिया येथिल आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी संघटनेचा राजीनामा देण्यापेक्षा ग्रामपंचायत सदस्य पदाचा राजीनामा दिला असता तर समाजाने स्वागत केले असते.आपली भुमिका बदल नाही तो पर्यंत समाजासाठी काही करु शकत नाही.आम्ही खोटे गुन्हे दाखल केले नाही.खोटा गुन्हा दाखल करायचा असता तर जातीवाचक शिवीगाळ केली आहे असाही गुन्हा दाखल करता आला असता.परंतू रस्ता लुटीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे.गाव तुमचे सत्ता तुमची म्हणून जर महिलेला मारहाण करीत असाल तर मागासवर्गीय समाज त्या महिलेच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहणार आहे.आम्हाला कोणत्याही जातीयाशी भांडायचे नाही.समानता प्रस्थापित करायची आहे.वैयक्तिक वादाची खुन्नस काढण्यासाठी दोन समाजात दरी पाडू नका.शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी पाच लाख रुपयाची वर्गणी जाहिर करतो.परंतू आंबेडकर, फुले, साठे यांचे पुतळे झाले पाहिजे. मागणी प्रमाणे सर्व स्मारकास परवानगी द्यावी.असे थोरात यांनी सांगितले.
यावेळी आर पी आयचे राज्य संपर्क प्रमुख श्रीकांत भालेराव म्हणाले की, ग्रामसभेत मारहाण झालेली महिला पदवीधर आहे.टाकळीमिया गावातील जातीयवादांना शिवाजी महाराज, आंबेडकर कळले नाही.यापुढील काळात आमच्या अंगावर आलात तर तेच शिंगे टोचणार आहे.टाकळीमिया ग्रामपंचायतीत जातीयवाद केला जातो.विधानसभेत हा प्रश्न तारांकीत केला जाणार आहे.आमच्या मिञ पक्षाच्या भाजपाच्या आमदारांना प्रश्न मांडण्यास सांगितले आहे.कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पोलिसांनी सांभाळावा.
यावेळी बाळासाहेब गायकवाड म्हणाले की,या घटने बाबत गृहमंञी दिलीप वळसे पाटील यांच्याशी बोललो आहे.एकमेकांन विरोधात गुन्हे दाखल करताना शाहानिशा करुन दाखल केली जावी.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविंद्र मोरे यांच्या विरोधात जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्याकडे सामुहीक तक्रार करण्यात येणार आहे.राजु शेट्टी यांची भेट घेवून मोरे सारखा जातीयवादीस संघटनेतून हकलपट्टीची मागणी करणार असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
याप्रसंगी भिभा बागुल, सुनिल शिरसाठ,विलास साळवे, कुमार भिंगारे, विनोद नन्नवरे,आशिष शेळके, सुनिल शिरसाठ, विजय जगताप,अजय साळवे, गोविंद दिवे,रमाबाई धिवर,अमित काळे,सुनिल चांदणे, रितेश एडके,सचिन साळवे,प्रकाश बनसोडे,संभाजी सांगळे,अशोक खरात,सचिन साळवे, आदिंनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी नेवासा,संगमनेर, श्रीरामपूर,राहुरी, अहमदनगर आदी भागातील तरुण या मोर्चात सहभागी झाले होते.सुनिता थोरात,सीमा बोरुडे,सुशिला धावणे, विलास सांगळे,राजाभाऊ कापसे,दिपक गायकवाड यांच्यासह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
दरम्यान पोलिस उपअधिक्षक संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी चोख बंदोबस्त ठेवला.आंदोलन कर्त्यांचे निवेदन पोलिस उपअधिक्षक मिटके यांनी स्वीकारले.
चौकट
सर्वांना समान न्याय दिला जाईल;पो.नि.दराडे
पोलिस ठाण्यावर दहा हजाराचा किंवा हजार लोकांचा मोर्चा आणा परंतू जे कायद्यात असेल तेच होईल कोणावर बळजबरी अन्याय केला जाणार नाही.यापुर्वी आलेल्या मोर्चेकरांना तेच सांगितले आहे. आज पुन्हा तेच सांगतो आहे.सर्वांना समान न्याय दिला जाईल असे राहुरीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितले.
देवळाली प्रवराच्या ‘त्या’ नेत्याने आम्हाला संविधान शिकू नये ;साळवे
टाकळीमिया येथे ग्रामसभेत महिलेला मारहाण झाल्याची फिर्याद दाखल केल्यानंतर त्या महिलेच्या पतीवर रस्तालुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. देवळाली प्रवरातील ‘तो’ नेता नगर पालिकेच्या नगराध्यक्षपदी विराज होताच डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांचे तैलचिञ नगराध्यक्ष दालनातुन काढुन टाकणारा ‘तो’ नेता मोर्चातुन संविधान तुम्हाला कळते का?असा प्रश्न केला आहे.आधी त्या नेत्याने कायदा शिकवून घ्यावा मगच संविधनावर बोलावे. संविधान आम्हाला शिकवण्याची गरज नाही ज्या रक्ताच्या माणसाने संविधान लिहले तेच रक्त आमचे आहे. ‘त्या’ नेत्याला संविधान कळत असते तर नगराध्यक्ष दालनातील डाँ.आंबेडकर यांचे तैलचिञ काढुन टाकले असते का? त्यामुळे ‘त्या’ नेत्याने आधी कायदा शिकवा मग संविधनावर बोलावे असे विलास साळवे यांनी सांगितले.