बेलापुरातील सोनवणे -आतार कुटुंबातील मारामारी प्रकरणी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल आरोपींची संख्या झाली पाच.
बेलापुरातील सोनवणे -आतार कुटुंबातील मारामारी प्रकरणी जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल आरोपींची संख्या झाली पाच.
बेलापुर (प्रतिनिधी )-लहान मुलांच्या भांडणाच्या कारणातुन दोन कुटुंबात जबर हाणामारी झाली होती त्यात दोन जण गंभीर जखमी झाले होते पोलीसांनी तीन जणाविरुध्द जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरुन गुन्हा दाखल केला आहे .तपासाअंती जातीवाचक शिवीगाळ व अँट्राँसीटी गुन्ह्याचे वाढीव कलम लावण्यात आले असुन तपासात आणखी दोन आरोपी निष्पन्न झाले असल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
बेलापुरातील बोरुडगल्लीत राहणारे आतार व सोनवणे या दोन कुटुंबात काही दिवसापूर्वी लहान मुलांच्या भांडणाच्या कारणावरुन वाद झाले होते ते वाद मिटविल्यानंतरही दुसऱ्या दिवशी दोन कुटुंबात तुफान हाणामारी झाली होती हाणामारीत कचरु धोडीराम सोनवणे विकास सोनवणे आकाश सोनवणे या तिघांनाही बेदम मारहाण करण्यात आली होती यात कचरु सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे त्यांना रक्तभंबाळ अवस्थेत आगोदर पोलीस स्टेशन नंतर साखर कामगार दवाखान्यात पाठविण्यात आले होते त्यांचेवर तसेच विकास सोनवणे व आकाश सोनवणे यां तिघावर साखर कामगार रुग्णालयात उपचार करण्यात आले होते कचरु सोनवणे यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी तीन आरोपीविरुध्द खूनाच्या गुन्ह्याच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता तसेच तीन आरोपींना अटकही करण्यात आली होती या गुन्ह्याचा तपास करत असताना तपासाअंती जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे निष्पन्न झाल्यामुळे आरोपी विरुध्द अँट्राँसीटी अँक्ट नुसार वाढीव कलम लावण्यात आले आहे .
तसेच याच गुन्ह्यात आणखी दोन आरोपींची नावे निष्पन्न झाली असुन आरोपी आयुब अनिस आतार व सुफीयान अकील आतार यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे या गुन्ह्यात एकुण पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत. कचरु धोंडीराम सोनवणे यांच्या तक्रारीवरुन बेलापुर पोलीसांनी अनिस दादासाहेब आतार अकील दादासाहेब आतार बबडी दादासाहेब आतार यांचेविरुध्द भादवि कलम ३०७ ,३२४ ,३२३ ,५०४ ,५०६ ,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता आता आयुब अनिस आतार व सुफीयान अकील आतार यांचेविरुध्दही गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास उपविभागीय पोलीस अधीकारी संदीप मिटके हे करत आहेत