वांगी बुद्रुक मधील घरकुल ड यादी भ्रष्टाचार प्रकरणी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावरून बातमी प्रसारित केल्याने सरपंच पती याचेकडून संपादकास जीवे मारण्याची धमकी
वांगी बुद्रुक मधील घरकुल ड यादी भ्रष्टाचार प्रकरणी पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनावरून बातमी लावल्याने सरपंच पती यांचेकडून संपादकास धमकी
रुद्रा न्यूजचे संपादक एन डी चोरमले यांना जीवे मारण्याची धमकी गुन्हा दाखल श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन काय कारवाई करणार याकडे जिल्ह्यातील पत्रकारांचे लक्ष
रूद्रा न्यूजचे संपादक तसेच दैनिक जन्मभूमीचे वार्ताहार यांनी वांगी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारास संबंधी व घरकुल ड यादी सर्वे मध्ये ज्या व्यक्तींच्या नावे ग्रामपंचायत मध्ये नोंद नाही अशा व्यक्तींच्या नावे पक्क्या घराच्या नोंदी असल्याचे त्यांना घरकुल यादी मधुन अपात्र केल्याने सर्वे चुकीचा झाल्याचे होणाऱ्या आरोपाचे पंचायत समिती श्रीरामपूर गटविकास अधिकारी यांच्याकडे अखिल मानवाधिकार मिशन संघटनेमार्फत दिलेल्या निवेदनावरून बातमी प्रसारित केली तसेच गावांमध्ये पिण्याच्या पाण्यामध्ये जंतू येत असल्याच्या नागरिकांच्या होणाऱ्या तक्रारीवरुन पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात बातमी प्रसारित केली त्याचा राग आल्याने सरपंच पती यांनी संपादक चोरमले यांना गावांमध्ये अडवून अरेरावीची भाषा वापरून कोणतेही अधिकार नसताना वांगी बुद्रुक ग्रामपंचायत मध्ये सरपंच पती नवनाथ जगन्नाथ बिडगर यांनी माझ्या ग्रामपंचायतच्या माझ्या सरपंच पत्नी विरोधातल्या बातम्या का लावतो म्हणून शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देत परत माझ्या गावात काही झाले किंवा ग्रामपंचायत मध्ये कितीही भ्रष्टाचार झाला त्याच्या बातम्या लावायच्या नाही माझी पत्नी सरपंच आहे तिची बातमी लावली तर तुला सोडणार नाही अशा धमक्या दिल्या ची व्हिडीओ रेकॉर्डिंग श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन चे आत्ता रुजू झालेले पोलिस निरीक्षक खाडे यांना दाखवलेली आहे अशा मुजोर गावगुंडांना वेळीच चाप बसण्याची गरज असल्याने त्यावर पोलिस निरीक्षक खाडे काय कारवाई करणार याकडे संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकारांचे लक्ष लागून आहे आज दुपारपर्यंत कारवाई न झाल्यास श्रीरामपूर एडिशनल एसपी ऑफिस समोर निवेदन देऊन ठिया आंदोलन करणार असल्याचे सर्व पत्रकार यांनी सांगितले यावेळी एस न्यूजचे संपादक जयेश सावंत रुद्रा न्यूजचे संपादक एन डी चोरमले ज्येष्ठ पत्रकार दिलीप लोखंडे अखिल भारतीय मानवाधिकार मिशन चे महाराष्ट्र अध्यक्ष विलास गिते नगर जिल्हाध्यक्ष धनंजय माने राहुरी तालुका अध्यक्ष नवनाथ पवार आदी पत्रकार उपस्थित होते