विद्यार्थ्यांकडून सफाई करून घेतली म्हणून पालकांनी जाब विचारला, मग शाळेतील 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला, निराश झालेल्या शिक्षकाने वर्गातच तणनाशक घेतले आणि आत्महत्या केली!
विद्यार्थ्यांकडून सफाई करून घेतली म्हणून पालकांनी जाब विचारला, मग शाळेतील 10 पैकी 9 विद्यार्थ्यांनी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेतला, निराश झालेल्या शिक्षकाने वर्गातच तणनाशक घेतले आणि आत्महत्या केली!
विशेष म्हणजे गेल्या 19 वर्षापासून शिक्षण क्षेत्रात असलेल्या या शिक्षकाची उत्कृष्ट शिक्षक म्हणूनही परिसरात ओळख होती व वडील माजी सैनिक, पत्नी शिक्षिका, भाऊ देखील शिक्षिका व भावजय देखील शिक्षक असलेल्या या पूर्ण शिक्षकी कुटुंबातील अरविंद देवकर यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
अरविंद ज्ञानेश्वर देवकर (वय 46 वर्ष राहणार निसर्ग सोसायटी उरुळी कांचन तालुका हवेली) असे या आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव असून देवकर हे जाऊजीबुवाचीवाडी हद्दीतील होलेवस्ती येथील शाळेत केवळ दोन महिन्यापूर्वीच बदलून आले होते. त्यांच्या पत्नी देखील शिक्षिका असून दोन महिन्यापूर्वीच शाळेत बदलून आलेल्या या शिक्षकाने काही दिवसांपूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांबरोबर या शाळेची साफसफाई करून घेतली होती.
मात्र विद्यार्थ्यांनी ही बाब घरी सांगितली व आपल्या मुलांकडून शाळेची साफसफाई करून घेतली म्हणून पालकांनी शिक्षकाला जाब विचारत फैलावर घेतले आणि त्यानंतर दहापैकी नऊ विद्यार्थ्यांनी शाळा बदलली. हे विद्यार्थी दुसऱ्या शाळेत प्रवेश घेताच देवकर यांना नैराश्य आले.
ही शाळा एक शिक्षकी शाळा असून या शाळेत केवळ दहा विद्यार्थी होते. त्यातील तब्बल नऊ विद्यार्थ्यांनी शेजारच्या दुसऱ्या बहुशिक्षकी शाळेत प्रवेश घेतला. सारेच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने नैराश्य वाटल्याने देवकर यांनी तीन ऑगस्ट रोजी शाळेतच तणनाशक प्राशन केले होते.
त्यांना तातडीने उरळीकांचन येथील दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, परंतु त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना हडपसर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले व तिथेच त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र पाच दिवसांनी म्हणजे काल 9ऑगस्ट रोजी याच रुग्णालयात उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
दरम्यान त्यांनी आत्महत्येची कारणे असलेली चिट्ठी नमूद केली असली तरी खाजगी सावकाराचा ही जात त्यांच्यामागे होता अशीही शंका व्यक्त केली जात असून याप्रकरणी अद्याप पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आलेली नाही मात्र आत्महत्या मध्ये त्यांनी विद्यार्थी सोडून गेल्याचे कारण नमूद केल्याचे सांगितले जात आहे.