ब्रेकिंग
टाकळीभान महादेव मंदिर ओढ्याच्या पुलाजवळ रस्ता दलदलीचा
टाकळीभान महादेव मंदिर ओढ्याच्या पुलाजवळ रस्ता दलदलीचा
टाकळीभान प्रतिनिधी: येथे पंचक्रोशी मध्ये भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्री शंभू महादेवाचे मंदिर आहे. श्रावण मास या पवित्र महिन्यामध्ये अनेक भाविक भक्त ,महिला भगिनी शंभू महादेवाच्या दर्शनासाठी पायी येत असतात. तसेच पूर्ण श्रावण महिन्यामध्ये पहाटच्या वेळी गावातील तरुण युवक व ग्रामस्थ महादेवाला गंगाजल अभिषेक घालत असतात. मंदिर रोडला कमानीच्या समोर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचले आहे, त्यामुळे येणाऱ्या भाविकांना तेथील खड्डे व चिखलाच्या दलदलीचा त्रास होत आहे. तरी महादेव यात्रा कमिटीने किंवा ग्रामपंचायतने महादेव मंदिराच्या रोडला कमानीजवळ असलेले खड्डे व दलदलीचा त्रास होऊ नये म्हणून त्या ठिकाणी मुरूम टाकावा अशी मागणी भाविक ग्रामस्थांनी केली आहे. त्यामुळे येणाऱ्या भाविकांची गैरसोय दूर होईल.