आणखी एक यशस्वी पाऊल गावठाण हद्दवाढी कडे. पंचनामे पूर्ण.- मयुर पटारे
आणखी एक यशस्वी पाऊल गावठाण हद्दवाढी कडे. पंचनामे पूर्ण.- मयुर पटारे
टाकळीभान प्रतिनिधी- टाकळीभान येथील गेल्या अनेक दिवसांपासून गावठाण हद्दवाढीचा पाठपुरावा शासन दरबारी सुरू होता. आज त्याच दिशेने आणखी एक यशस्वी पाऊल पुढे पडले आहे ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मयूर पटारे. त्यांनी व्यक्त केले,
महसूल विभाग मार्फत गावातील 32, 189, 246, 247, 252, 256, 286, 287 गटांचा पंचनामा करण्यात आला. पंचनामा करून या गटांच्या हद्दी बघून तिथं वास्तव्यास असलेल्या अंदाजित लोकसंख्येचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये अनुसूचित जाती व जमाती, व इतर लोकसंख्येची माहिती गोळा करून या गटांमध्ये एकूण कुटुंब संख्या अशाप्रकारे सर्व माहिती अहवाल तयार करण्यात आला.
गट नंबर २४५ मधील दावा मा. उच्च न्यायालयात प्रलंबित असल्या कारणाने सदर गट ह्या प्रक्रियेतून वगळण्यात आला असून हा गट देखील गावठाण हद्दवाढीसाठी गृहीत धरावा अशी विनंती यावेळी प्रशासनास करण्यात आली. त्याकामी सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यासाठी संपूर्ण ताकदीने पाठपुरावा सुरू ठेवण्यात येईल.
ग्रामपंचायत टाकळीभानच्या वतीने मा.सरपंच यांच्याकडून २८/०१/२०२२ रोजी मा.जिल्हाधिकारी साहेब यांना शासन निर्णय १०/०२/१ व शासन परिपत्रक ०७/०५/१९८७ नुसार गावठाण विस्तार योजनेचा लाभ मिळण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर मा. उपविभागीय अधिकारी साहेब व मा. तहसीलदार साहेब यांनी १७/०२/२०२२ पासून कार्यवाही सुरू केली. सर्वेक्षण पूर्ण झाले असून गावच्या जिव्हाळ्याचा “घरकुल” प्रश्न (आहे त्या जागेवर घरकुल) मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असून लवकरच हा प्रश्न आता सुटणार आहे. काही गटांची अधिसूचना जारी असून उरलेल्या गटांची अधिसूचना बाकी आहे. जिल्हा भूमी अभिलेख यांच्याकडे अपील करण्यात येणार असून लवकरच त्या गटांच्या बाबतीत अमलबजावणी होईल.
याकामी मा. जिल्हाधिकारी , मा. उपविभागीय अधिकारी , मा. तहसीलदार , मा.मंडळ अधिकारी , मा. तलाठी भाऊसाहेब, मा. ग्रामविकास अधिकारी व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे लाभत असलेल्या सहकार्य व मार्गदर्शनासाठी टाकळीभानकरांच्या वतीने आभार व्यक्त केले ,