न्यू इंग्लिश स्कुल,टाकळीभान येथे *नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत व शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा*

न्यू इंग्लिश स्कुल,टाकळीभान येथे
*नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत व शाळा प्रवेश दिन उत्साहात साजरा*
टाकळीभान प्रतिनिधी -टाकळीभान येथे आज नवीन विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.या सोहळ्यात नवीन आलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तक,गुलाबपुष्प तसेच भिस्कीट देण्यात आले.या प्रसंगी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी व शुभेच्छा देण्यासाठी स्थानिक स्कुल कमिटीचे सदस्य मा.श्री राहुलभाऊ पटारे,मा.भारतभाऊ भवार,पालकवर्गातून श्री रघुनाथ शिंदे,श्री महेंद्र संत व सत्कारमूर्ती श्री तुकाराम पटारे विद्यालयाचे प्राचार्य मा.श्री इंगळे बी.टी.आदी मान्यवर उपस्थित होते.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत 5 वी ते 8 वी च्या कु.आरोही अनिल भोसले,कु.सपना संदीप राणनवरे,प्रथमेश किरण खामकर या विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी ची पुस्तक संच प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले व सर्व नवप्रवेशीत इयत्ता 5 वी च्या सर्व विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत व शुभेच्छा दिल्या.विद्यालयात पहिल्याच दिवशी 75 ते 80 % विद्यार्थी उपस्थित होते हे अभिमानास्पद आहे असे मान्यवरांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले व सर्वांना नवीन शैक्षणिक वर्ष 2022-23 साठी शुभेच्छा दिल्या.
विद्यालयाचे प्राचार्य श्री इंगळे साहेब यांच्या हस्ते MPSC पात्र श्री तुकाराम पटारे यांचे अभिनंदन शालश्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले या प्रसंगी सर्व विद्यार्थी,शिक्षकवृंद,शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.