ब्रेकिंगमहाराष्ट्र

मुड़े बहीण-भावातील कटुतेला अखेर पुर्णविराम

मुड़े बहीण-भावातील कटुतेला अखेर पुर्णविराम

 

आमचं एका सुईच्या टोका एवढेही बैर नाही, दोघांनीही भारजवाडीत केली घोषणा, 

 

भगवान गडाची मी पायरी – पंकजाताई तर धनंजय मुंडे म्हणाले, मी त्या पायरीचा दगड

 

 संत भगवान बाबा यांच्या फिरत्या नारळी सप्ताहात भाजप नेत्या पंकजाताई मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यात मनोमिलन झालेले पाहायला मिळाले. यामुळे बहीण भावातील संघर्षाची दरी कमी झाल्याची व्यासपीठवरून दोघांनी घोषणा केली. सत्ता संघर्षावरून अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या मुंडे बहिण भावाचा संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला होता. मात्र, याच संघर्षाला भगवान गडाच्या पायथ्याशी भारजवाडी गावात नारळी सप्ताहाच्या समारोप प्रसंगी पूर्णविराम झाल्याची कबुली दोघा बहीण भावाने दिली.

 

याप्रसंगी पंकजाताई मुंडे यांनी बोलताना माझा भाऊ मोठा झाला असेल तर मला आनंदच आहे, असं म्हणून या संघर्षाला पूर्णविराम देण्याची सुरुवात केली. यावेळी उपस्थित जनसमुदायाने टाळ्या वाजवून सादही दिली. धनंजय नंतर चार वर्षांनी माझा जन्म झाला. त्याचं काहीतरी कारण असेल. कुळाचा उद्धार करण्यासाठी एकाला दोन असतील तर काय झालं दोघेही आम्ही पराक्रमी आहोत. त्याचा पराक्रम माझा पराक्रम वेगळा, त्याचा पक्ष वेगळा माझा पक्ष वेगळा आहे. दोघं एकाच पाठीवरती जन्माला आलो. आमचे भविष्य काही वेगळं असेल. त्यासाठी काही वेळा वाट पाहा, असं म्हणत पंकजाताई मुंडे यांनी बहिण भावाच्या एकत्रिकरणाचा नवा संकेत दिला आहे. पंकजाताई मुंडे यांच्या भाषणानंतर धनंजय मुंडे उभा राहिले. या मनोमिलनाची री पुढे ओढत. भारजवाडीला भारगजवाडी असा उल्लेख मी मुद्दामून केला असं म्हणत धनंजय मुंडे यांनी आमच्या दोघा बहिण भावाच्या नात्यांमधील काही गज का होईना अंतर या नारळी सप्ताहात कमी झालं अशी कबुली दिली. आम्ही दोघे वेगवेगळ्या पक्षात वेगवेगळ्या विचाराने काम करतो. विचारांमध्ये भलेही कोसवांतर दूर असली तरी चालेल वर घरामधल्या संवादामध्ये एक तसूभर सुद्धा अंतर नसले पाहिजे. ते अंतर कमी झालं. मुंडे कुटुंबातील गडाच्या भक्ती संदर्भात कोणीही संशय घेण्याचं कारण नाही, असं म्हणत गडाच्या वादावर पूर्णविराम दिला. मोठा भाऊ या नात्याने लहान बहीणनी ने जे भगवानगडासाठी करायला सांगितलं आहे, ते मी सर्व करेल असं म्हणत आमच्या विचाराच्या वाटण्या आहेत. आमचं एक सुईच्या टोका एवढेही वैर नाही. राजकीय विचाराच्या वाटण्या आहेत, असं म्हणत धनंजय मुंडे संघर्षाला पूर्णविराम दिला. धनंजय मुंडे यांचे भाषण सुरू असताना सभेमधून एका व्यक्तीने तुम्ही दोघजण आणि एकत्रित यावं असे विनंती केली. उत्तर देताना धनंजय मुंडे यांनी जे होतं ते बन्यासाठी होतं असं म्हणताना पंकजाताई दोन वेळेस आमदार राहिल्या. त्या मंत्री झाल्या त्याच पद्धतीने मी आमदार झालो विरोधी पक्ष नेता झालो आणि मंत्रीही झालो जर असं झालं नसतं तर दोघांपैकी कोणीतरी एकच मंत्री झाला असता, असं तुम्ही समजून घ्या म्हणत धनंजय मुंडे यांनी आम्ही दोघे एकच आहोत असे संकेत दिले. भगवानगडाच्या पायथ्याशी हजारो भाविक भक्तांच्या समोर काल पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचे मनोमिलन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे