*राष्ट्रीय श्रीराम संघा च्या मनमाड़ शहर व परिसरात एकाच दिवशी १३ शाखेचें उद्घाटन*
*राष्ट्रीय श्रीराम संघा च्या मनमाड़ शहर व परिसरात एकाच दिवशी १३ शाखेचें उद्घाटन*
(प्रतिनिधि) मनमाड़ शहर व नांदगाव तालुका,जिल्हा नाशिक,मधे एकाच दिवशी राष्ट्रीय श्रीराम संघ, च्या सुमारे १३ शाखेचें उद्घाटन पार पडले.या प्रसंगी, राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग व संस्थापक अध्यक्ष आकाश बेग,सोनू बेग व मनमाड़ चे या तेरा शाखेचें नियोजन कर्ते तथा, राज्य संघटक योगेश चुनियान तसेच शेकडो कार्यकरते तथा स्थानिक नागरिक यांचा उपस्तिथि मधे पार पड़ला.या शाखानमुळे, स्थानिक राजकीय वातावरण ढवळून निघणार हे निश्चित.
राष्ट्रीय श्रीराम संघ, धर्म रक्षण
धर्म संघटक, या उदेशाने काम करणया बरोबरच समाजातील सर्व धर्मिय लोकांना बरोबर घेउन , त्याच्या समस्या आपल्या समजून समाजिक काम करणार संघटन आहे.असे विचार व मत सागर बेग यांनी मांडले.
या निम्मित्ताने मनमाड़ शहर व परिसर तसेच ग्रामीण भागात ही राष्ट्रीय श्रीराम संघ पोहचताना दिसत आहे.सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे बिगुल क़धी वाजू शकते अश्या प्रसंगी या शाखा मनमाड़ शहर व तालुक्यात राजकीय वातावरण ढवळून काढ़नार यात शंका नाही.
या तेरा शाखेचें उद्घाटन परिसर व शाखाप्रमुख ख़ालील प्रमाने,नांदगाव प्रशांत सोळसे,मनमाड़ शहर आदित्य मंगवाना,आठवडे बाज़ार अमन बेद,मनमाड संदीप गवळी,चांदवड रविंद्र गुंड़,एम,जी काॅलेज कन्हैया पावर,विवेकांनद नगर ओम् शेलार,हनुमान नगर सागर पळसकर,नागापूर संतोष कापसे, पनेवाड़ी विशाल घड़गे,बेजगांव हनुमान काकड, सारणा अक्षय चव्हाण,बोहरी कंपाउंड गणेश पावर.