राज्यातील दीड कोटी धनगर समाजावर राज्यकर्त्यांकडून अन्याय- दत्ता वाकसे*
*राज्यातील दीड कोटी धनगर समाजावर राज्यकर्त्यांकडून अन्याय- दत्ता वाकसे*
वडवणी: महाराष्ट्र राज्य हे अतिशय सुजलाम-सुफलाम म्हणून ओळखले जाते याच राज्यांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात दोन नंबरवर असलेल्या आणि दऱ्याखोऱ्यात मेंढपाळ व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणारा समाज म्हणुन धनगर समाजाकडे पाहिले जाते आज राज्यांमध्ये जवळपास 288 मतदार संघामध्ये दीड कोटी जवळपास असलेल्या धनगर समाजाला मात्र राज्यकर्त्यांनी वेळोवेळी अन्यायाची वागणूक दिलेली आहे आणि राज्यकर्त्यांकडून दीड कोटी धनगर समाजावर अन्याय केलेला आहे असे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्ताने धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी व्यक्त केले आहे
पुढे बोलताना ते म्हणाले की सध्या राज्यामध्ये काही राजकीय पक्षांकडून समाजावर मोठ्या प्रमाणात अन्याय होताना दिसत आहे पूर्वी आमचा समाज हा अडाणी आणि अशिक्षित असल्यामुळे या समाजावर खूप मोठ्या प्रमाणात काही राज्यकर्त्यांनी राज्य केल्याने स्वतःची राजकीय पोळी भाजून घेतली त्यामुळे हा समाज विकासापासून कोसो दूर राहिला आहे या समाजाला मना व त्या प्रमाणात राजकीय प्रतिनिधित्व मिळाले नाही राज्यामध्ये दीड कोटी असलेल्या धनगर समाजाला मात्र दोन आमदार एक मंत्री पर्यंत संधी मिळाली मात्र विशेषता याठिकाणी राज्यांमध्ये दीड कोटी असलेला समाज आणि या समाजाला जवळपास तीस ते पस्तीस आमदार अपेक्षित होते परंतु आम्हाला या राज्यकर्त्यांनी राजकीय व्यासपिठापासून दूर ठेवण्याचं काम केलं आता आम्ही या राजकीय लोकांना ओळखले असून आगामी काळात मात्र आम्ही या राजकीय लोकांना धडा शिकवणारा असल्याचे वाकसे यांनी देखील म्हटले आहे आज मीतिला राज्यातील दीड कोटी समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षण मिळणे अपेक्षित होते आणि त्याबाबत भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या पुष्ठ क्रमांक 36,वर धनगर ओरान असा समाविष्ट केलेला आहे परंतु येथील तत्कालीन राज्यकर्त्यांनी जाणून बुजून या समाजाला बाबासाहेबांनी दिलेला आरक्षण आणि त्यापासून दूर ठेवण्याचे काम केलेला आहे मात्र आम्ही आगामी काळात या राज्यकर्त्यांना धडा शिकवल्याशिवाय शांत बसणार नाही त्यामुळे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये यांना घरचा रस्ता दाखवा असेदेखील त्यांनी बोलताना व्यक्त केले यावेळी व्यासपीठावर राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते
धनगर समाजाने खेकडा वृत्ती बंद करून समाजातील युवकांना प्रोत्साहन द्यावे..!
धनगर समाज हा पूर्वीपासूनच शिक्षणापासून कोसो दूर असून आता कुठेतरी हा समाज शिक्षणाच्या प्रवाह मध्ये येताना दिसत आहे परंतु आपल्या मध्ये असलेली खेकडा वृत्ती बंद केले पाहिजे त्यामुळे आपला समाज हा विखुरलेला जात असून त्यावर मात्र इतर समाजाचे नेते राज्य करत आहेत त्यामुळे आपण त्याकडे आवृत्ती बंद करून एकमेकांच्या हातात हात देऊन राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये प्रगती केली पाहिजे त्यामुळे आगामी काळात कुठल्याही निवडणुकांमध्ये समाजाचा व्यक्ती उभा राहिला तर त्याला मताच्या माध्यमातून संधी दिली पाहिजे त्यामुळे कुठेतरी या लोकांना आपली ताकद कळेल असेदेखील धनगर समाज संघर्ष समिती बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी म्हटले आहे.