जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सोनई येथे रस्ता रोको.
जालना येथील घटनेच्या निषेधार्थ सोनई येथे रस्ता रोको.
सोनई दि 3. जालना येथील अंतरवाली गावात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने गेल्या चार दिवसापासून आंदोलन सुरू होते तेथील आंदोलकावर अमानुष अत्याचाराच्या निषेधार्थ आज सोनई येथे जिल्हा परिषदचे अर्थ व पशुसंवर्धन चे माजी सभापती सुनील गडाख यांच्या नेतृत्वाखाली सकाळी दहा वाजता सोनई बस स्थानक परिसरातील राहुरी शनिशिंगणापूर रास्ता रोको करून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले यावेळी चारशे ते पाचशे युवक उपस्थित होते जालना येथील अंतरवेली गावात मराठा समाजाच्या वतीने चार दिवसापासून शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू होते मात्र पोलीस बाळाचा वापर करून आंदोलन मोडून काढण्याच्या उद्देशाने आंदोलकावर अमानुष पणे बेछुट लाठीमार केला या आंदोलनासाठी उपस्थित असलेल्या माता भगिनीना अमानुषपणे मारहाण केली त्यात बरेच पुरुष व महिला जखमी झाले आहेत काहींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते यावेळी वक्त्यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला सरकारकडून शांततेच्या मार्गाने आंदोलन होत असताना ती मोडून काढण्यासाठी आहे सोनई पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र थोरात यांनी आंदोलन कर्त्याचे निवेदन स्वीकारले सोनई पोलीस वतीने चौक बंदोबस्त ठेवण्यात आला सोनई सोसायटीचे माजी चेअरमन आप्पासाहेब निमसे, संदीप कुसळकर अनिल निमसे, अंबादास राऊत, संतोष तेलोरे, रामनाथ बडे,प्रकाश शेटे, गणेश गडाख आदी युवा कार्यकर्ते उपस्थित होते आंदोलन एक तासभर चालल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या