पन्नास हजार हिंदूंनीच माझ्यावर दाखवले प्रेम, भविष्यातील राजकीय बदलाची सुरुवात.धर्मकार्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघ मजबूत करणार- सागर बेग

पन्नास हजार हिंदूंनीच माझ्यावर दाखवले प्रेम, भविष्यातील राजकीय बदलाची सुरुवात.धर्मकार्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघ मजबूत करणार- सागर बेग
कोणत्याही राजकीय पक्षाचा आधार न घेता आणि हिंदूंच्या मतांवर आजवर प्रबळ झालेल्या कोणत्याही पुढाऱ्यांपुढे न झुकता अपक्ष उमेदवारी करूनही फक्त पन्नास हजार हिंदूंनीच माझ्यावर दाखवलेले प्रेम हे भविष्यातील राजकीय बदलाची सुरुवात असून धर्मकार्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघ या स्वसंघटनेला मजबूत करण्याचा निर्धार सागर बेग यांनी व्यक्त केला आहे.
प्रस्थापित काँग्रेसी पुढाऱ्यांना घाम फोडणाऱ्या आणि फक्त हिंदूंनाच मते मागून सेक्युलॅरिझमच्या नाकावर टिच्चून हिंदूंचे पन्नास हजार मते मिळवणाऱ्या सागर बेग यांनी त्यांच्या राष्ट्रीय श्रीराम संघ या हिंदुत्व हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या संघटनेला बळकटी देण्यास सुरुवात केली असून शहरातील अक्षय कॉर्नर याठिकाणी राष्ट्रीय श्रीराम संघ शाखेच्या उद्घाटन प्रसंगी बेग हे बोलत होते.
ते पुढे म्हणाले की,यापुढे मतदारसंघातील सगळ्याच गावांमध्ये राष्ट्रीय श्रीराम संघाची स्थापना करणार असून त्यामाध्यामातून हिंदूंवर होणारे अन्याय अत्याचार यावर आवाज उठवून न्याय देण्याचा प्रयत्न नाही तर न्यायच दिला जाणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.हिंदूंच्या मतांवर पोसलेल्या स्थानिक पुढाऱ्यांनी कधीही हिंदू हिताच्या गोष्टी केलेल्या नाहीत.बेरोजगारी,महागाई आणि विकास या भुलभुलैयातच हिंदूंना जाणीवपूर्वक अडकवून विधर्मी हिंदू विरोधियांचे भले केले आहे.आता हिंदू जागा झाला असून त्यांच्यावर होत असलेल्या अन्याय अत्याचारावर तो आता उघडपणे बोलायला लागला आहे.त्याचाच परिणाम या निवडणुकीत माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला जवळपास पन्नास हजार मते देऊन त्यांनी दाखवून दिले आहे.
श्रीरामपूरच्या राजकारणात हिंदू हितासाठी आता लक्ष देण्याचा त्यांनी पक्का निर्धार यावेळी व्यक्त केला आहे.याप्रसंगी मोरगे वस्ती बाजार तळ परिसरातील असंख्य युवक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.