प्राईड अॅकेडमीच्या दिंडीच्या ‘जय हरी विठ्ठल’ घोषाने दुमदुमली पाथरे नगरी
आधी रचली पंढरी । मग वैकुंठ नगरी ।।
जेव्हा नव्हते चराचर । तेव्हा होते पंढरपूर ।।
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- पंचायत समिती सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे व माऊली प्रतिष्ठानचे ज्ञानेश्वर(माऊली) मुरकुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या माऊली प्रतिष्ठान चरिटेबल ट्रस्ट श्रीरामपूर संचलित प्राईड अॅकेडमीच्या विद्यार्थ्यांची आषाढी एकादशीच्या निमित्ताने वारकरी वेशात हातात टाळ, गळ्यात तुळशीच्या माळा, कपाळी अष्टगंध, खांद्यावर भगवी पताका, मुलींच्या डोक्यावर तुळशी कलश व मुखी हरीनाम घेत पाथरे येथील वातावरण भक्तिमय झाले होते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला, हरी ओम विठ्ठला, ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिका वरदेव हरी विठ्ठल गजराने पाथरे नगरी दुमदुमली. शिस्तबद्धपणे विद्यार्थ्यांनी चालत जात गावात रिंगण सोहळा पार पाडला.
निवृत्ती,ज्ञानदेव, सोपन, मुक्ताबाई, संत गोरा कुंभार, जनाबाई यांच्या वेशात विद्यार्थ्यांनी रूपे साकारली. प्राईड अॅकेडमीमध्ये चार भाषा शिकविल्या जातात. विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृत भाषेत पाथरे वासियांचे स्वागत केले.
प्राईड अॅकेडमीच्या प्राचार्या प्रीती गोटे यांनी दिंडीच्या, शाळेच्या व महाविद्यालाबाबत माहिती विषद केली. दरवर्षी प्राईड अॅकेडमी कार्यक्षेत्रातील गावात दिंडीच्या माध्यमातून फक्त अभ्यासक्रमच शिकविला जात नाही तर हिंदू संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावेत यासाठी विविध सण उत्साहात विद्यालयात साजरे केले जातात. यावेळी उत्कृष्ट वेशभूषा असणाऱ्या विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले.
त्याप्रसंगी प्राईड अॅकेडमीच्या प्रवर्तक व पं. स.सभापती डॉ.वंदनाताई मुरकुटे,संस्थापक माऊली मुरकुटे, सरपंच गिताराम घारकर, मोहनबाबा टेकाळे, सखाहरी महाराज जाधव, सुनिल टेकाळे, हरिभाऊ जाधव, संभाजी निमसे, माऊली टेकाळे, रणछोड जाधव, अप्पासाहेब जाधव, भिकाभाऊ जाधव, डॉ. बाळासाहेब जाधव, अनिल टेकाळे, गंगाधर आढाव, दिलावर पठाण, अशोक टेकाळे, गणेश जाधव, एकनाथ जाधव, गणेश कातोरे, सोपान जाधव, दिपक कोल्हे, गणेश टेकाळे, पप्पु पवार, कपिल जाधव, सचिन कदम, राहुल गावडे, विजय जाधव, कृष्णा तुपे, गणेश कवडे, राहुल बनकर, आप्पासाहेब पवार, प्राचार्य विध्यार्थी ,पालक व पाथरे ग्रामस्थ ,विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते..
रिंगण सोहळ्यानंतर शिस्तबद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांनी दिंडीतील विठ्ठल रुख्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी संभाजी निमसे यांनी गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा दिल्या तर हभप सखाहरी महाराज जाधव यांनी मार्गदर्शनपर भाषण केले व प्राईड अॅकेडमीच्या उपक्रमाचे कौतुक केले. वरील मान्यवरांनी विद्यार्थ्यांना फराळ, उपवास पदार्थांचे वाटप केले. यावेळी परिसरातील नागरिक, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सदर दिंडी सोहळ्यासाठी प्राचार्या, शिक्षक व इतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला.