येवला येथे कांदा उत्पादक परिषदेचे आयोजन…
येवला येथे कांदा उत्पादक परिषदेचे आयोजन…
श्रीगोंदा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे शेतकरी संघटनेचे आवाहन…
देशात आज कांद्याचे बाजारभाव पडले असून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा पडली आहे. दिवसेंदिवस बळीराजावर नवीन संकट येत आहे. पाऊस लांबल्याने शेतकरी हवालदील झाला आहे. त्यातच पिके जळून गेल्यावर कुकडी चे आवर्तन सुटलेले आहे. तालुक्यातील नेते मात्र श्रेय घेण्यात व्यस्त आहेत.
आज कांद्याचे भाव पडले आहेत. कवडीमोल भावाने शेतकऱ्यांचा कांदा विकला जात आहे. त्यामुळे शेतकरी कांद्यामुळे रडला आहे.कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शेतकरी संघटना उभी राहिली असून शेतकरी संघटनेच्या वतीने ललित पाटील बहाळे यांच्या अध्यक्षतेखाली कांदा उत्पादक परिषद आयोजित केली आहे.चाळीस वर्षानंतर कै. शरद जोशी यांच्या संकल्पनेवर येवला या ठिकाणी संघटनेने कांदा परिषद आयोजित केलेली आहे.सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या चुकीच्या आयात निर्यात धोरणाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने येवला या ठिकाणी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे .