अखेर तिळापुर सोसायटीचे अचानक आलेले 22 सभासद अपात्र तर 11 सभासद राहिले मतदानापासून वंचित काय कारवाई होणार याकडे संपूर्ण राहुरी तालुक्याचे लक्ष.
अखेर तिळापुर सोसायटीचे अचानक आलेले 22 सभासद अपात्र तर 11 सभासद राहिले मतदानापासून वंचित काय कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष.
राहुरी तालुक्यामध्ये नुकत्याच सहकारी सोसायटी यांच्या निवडणुका पार पडल्या यामध्ये कुसर गाव महेश गाव मधील 95 तर तिळापुर मधील 22 बोगस सभासदांचे काल राहुरी सहाय्यक निबंधक यांच्या कायदेशीर प्रक्रियेने सभासद अपात्र ठरवले आहे झाले असे की तिळापुर मधील सहकारी सोसायटीचा निवडणूक का लागल्यानंतर गावातीलच अण्णासाहेब रामदास जाधव व नामदेव शंकर गरदरे यांनी या बोगस सभासदांवर हरकती घेतल्या होत्या परंतु निवडणुकीचा प्रोग्राम लागल्याने हे बोगस सभासद राहून गेले व खरे मतदार वंचित राहिले होते 25 /5/ 2022 रोजी च्या नामदेव शंकर गरदरे यांच्या अर्जानुसार सदर प्रकरणी अर्जदार व संस्थेचे सचिव यांची दिनांक 4/7/2022 व 14/7/2022 सुनावणी घेण्यात आली आहे. रोजी संस्थेचे गट सचिव यांना संधी देऊन देखील सुनावणी वेळी त्यांनी 22 सभासद हे संचालक मंडळाच्या ठरावानुसार नियमानुसार सभासद झालेली आहे तथापि यासंदर्भाने त्यांना सभासद केल्याबाबत संस्थेचा ठराव सभासद अर्ज प्रवेश फी शेअर्स फी इत्यादी बाबी सादर करू शकले नाहीत.
तथापि अहंत दिनांकाच्या संदर्भाने नजरचुकीने त्यांची नावे मतदार यादीमध्ये समाविष्ट झाल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे बावीस सभासद हे बोगस असल्याचे निदर्शनात आल्याचे पत्रात नमूद केले आहे.
तसेच संस्थेच्या लेखापरीक्षण अहवाल सन 2019-20 मध्ये नावे असताना देखील 11 सभासदांच्या पात्र मतदार यादी मध्ये नावे समाविष्ट न केल्यामुळे 11 सभासद मतदानापासून वंचित राहिले आहेत त्यामुळे त्यांना मतदानाचा हक्क असूनही मतदान करता आले नाही. हेही स्पष्ट झाले आहे गट सचिव यांची निष्काळजीपणा केल्याचे दिसून येत असल्याचे सहाय्यक निबंधक यांच्या पत्रात नमूद केले आहे.
या सर्व बाबी स्पष्ट झाल्याने निवडून आलेले संचालक हे बेकायदेशीर आहेत. त्यामुळे संबंधित निवडणूक रद्द करण्यात यावी व लोकशाही पद्धतीने निवडणूक प्रक्रिया घेण्यात यावी अशी मतदानापासून वंचित राहिलेल्या सभासदांची मागणी होत आहे.यावर काय कारवाई होणार याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.