शहरातून जाणाऱ्या बायपास टू बायपास चे झाले उद्घाटन..!*
*गेवराई शहरातून जाणाऱ्या बायपास टू बायपास चे झाले उद्घाटन..!*
*गेवराई मतदारसंघात विकासाची गती “डब्बल डेक्कन” सारखी धावणार ;- आमदार लक्ष्मण पवार*
अडीच वर्षापासून विकासाची गरज असताना, मागच्या सत्ताधाऱ्यांकडून अडवणूक होत होती. त्यामुळेच, विकासाची कामे रखडली होती. मात्र, आता सामान्य माणसाला न्याय देणारे शिंदे-फडणवीस सरकार आले असून, गेवराई मतदारसंघातविकासाला गती मिळणार असून, विकासाची “डब्बल डेक्कन” ट्वेन्टी ट्वेन्टी मॅच सारखी धावणार असल्याचा दृढ विश्वास आमदार लक्ष्मण पवार यांनी येथे व्यक्त केला आहे. शुक्रवार ता.22 रोजी सायं सहा वाजता आयोजित करण्यात आलेल्या आठ कोटी रुपये खर्चाच्या रस्ता उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहरातील नागरीकांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना
आमदार पवार यांनी सांगितले की, अनेक दिवसांपासून रखडलेला हा महत्त्वपूर्ण विषय ना. गडकरी यांनीच निकाली काढला. गेवराईतील जनतेच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करून आमदार पवार म्हणाले की,
आता आपले सरकार आले आहे. चिंता करू नका, विकासाचे चाक वेगाने धावणार आहे. रस्ता दर्जेदार वापरण्यात येईल, संबंधित एजन्सीला कडक सुचना दिल्याचे ही त्यांनी सांगितले.
शहरातुन हायवेवर जाण्यासाठी वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत होता. आ. लक्ष्मण पवार यांनी शहरातुन बायपास टु बायपासला ८ कि. मी. डांबरी रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळवण्यासाठी केद्रीय रस्ते व दळणवळण मंत्री ना. नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला होता.
आ. पवारांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले. शुक्रवार दि. २२ रोजी सायं सहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे करण्यात आले. आता, गेवराई शहरातील नागरिकांचा दळणवळणाचा मार्ग सुकर होणार असून, नागरिकांना रहदारीसाठी मोठी कसरत करावी लागत होती. आता चिंता मिंटली आहे. या कार्यक्रमास
युवा नेते शिवराज पवार, न.प.उपाध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, न.प.अध्यक्ष सुशील जवंजाळ, कन्स्ट्रक्शन मॅनेजर कुलदीप पांडे, दादासाहेब गिरी, जि. प.सदस्य प्रल्हाद माने, पं.स. सदस्य संजय जाधव, प्रा.शाम कुंड, नगरसेवक भगवान घुंबारडे, राहुल खंडागळे, जानमोहमद बागवान, अजित कानगुडे, फेरोज अहेमद, याहीया खान, संजय इंगळे, ऍड.उद्धव रासकर, राजेंद्र भंडारी, उद्धव मडके, ब्रह्मदेव धुरंधरे, लक्ष्मण चव्हाण, करण जाधव, सचिन मोटे, कृष्णा मुळे, महेश सौंदरमल, बददुभाई, मनोज हजारे, मुन्नाशेठ, अमोल मस्के, विठ्ठल मोटे, नंदू गरड, सचिन वावरे, देविदास नाना फलके, ईश्वर पवार, माऊली पवार, ऍड.सुरेश पवार, समाधान मस्के, मुन्ना मोटे, नुमान फारोकी, कृष्णा पाटोळे, किशोर धोंडलकर, बाबासाहेब घोडके, बंडू बारगजे, इसुफ भाई चाऊस, रईस शेठ,
गोपाल चव्हाण, मानिकशेठ बागवान, प्रभाकर भालशंकर, यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी यांची उपस्थिती होती.