ध्येयवादी युवा पत्रकार

ध्येयवादी युवा पत्रकार
तरुणापासूंन जेष्ठ पत्रकारांमध्ये मनमोकळेपणाने मिसळत, तत्व,आदर्श मुल्ये जपत पत्रकारिता क्षेत्रात काम करतांना सर्वसामान्य माणसांसाठी धडपड करत विविध आव्हानांना तोंड देण्याची वृती या मुळे
अल्पावधीतच डिजिटल मिडिया पत्रकारितेच्या माध्यमातून युवा तरुण पत्रकार शेख जावेद यांनी जनमानसांत आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे.
शेतकऱ्यांवर नैसर्गिक संकट असो की मागच्या काळात आलेली भयंकर महामारी कोरोना या सारख्या संकटात जनतेच्या समस्या डिजिटल मिडियाच्या माध्यमातून रोखठोक पद्धतीने मांडून स्वत वेळ प्रसंगी मदत करण्याचे धाडस या युवा पत्रकाराने केले आहे.तालुक्यातील कोणतीही समस्या ,घटना, घडामोडी, अचूकपणे मांडणी करुन सर्वसामान्यांच्या हिताची पत्रकारिता करत असतानाच आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात जनजागृती करून समाज परिवर्तन घडविण्यासाठी परिश्रम करित आहेत.जिवानाच्या पटलावर अल्पावधितच अनेंक संकटाना समोरे जावे लागले. खा.बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांच्या विचाराने प्रभावित होऊन एम.आय.एम.पक्षाच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले मात्र स्थानिक राजकारणात पक्षांतर्गत मतभेद झाले झाल्याने ते पक्षापासून वेगळे झाले कालांतराने आ.लक्ष्मण पवार हे शहराच्या विकासासाठी करत असलेली धडपड पाहता शेख जावेद हे त्यांच्या सोबत जोडले गेले, पुढे एके दिवशी आपल्या नेत्यावर खोटा गुन्हा दाखल झाला हे पटण्यासारख नव्हत मंग काय त्यांनी थेट बीएसएनएल टॉवर च्या टोकावर चढून आंदोलन करत लोकांचे लक्ष केंद्रित केले मात्र हे सर्व करुन ही त्यांना राजकारणात जम बसवता आला नाही. त्यांनतर सामाजिक ,शैक्षणिक, राजकीय अनुभवातून त्यांनी पत्रकार हा समाजाचा आरसा आहे, समाजाच्या जडणघडणीत पत्रकारांचे मोठे योगदान आहे याची जाणीव ठेऊन पत्रकारितेच्या माध्यमातून समाजसेवा करण्यासाठी डिजिटल मिडिया ,मराठवाडा न्युज पोर्टल हा युट्यूब चॅनल सुरू करत संपादक म्हणून अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार, समाजातील उपद्रव याबाबत पत्रकारितेच्या माध्यमातून निर्भीडपणे आवाज उठवून जनतेला न्याय मिळवून देत पत्रकारितेला न्याय देण्याचे काम करत आहेत. अनेकदा उथळ पत्रकारितेमुळे सामाजिक प्रश्नही निर्माण होतात… मात्र पत्रकारितेच्या या बदलत्या स्वरूपातही लोकशाहीच्या या चौथ्या खांबाचं पावित्र्य जपण्याचा आटोकाट प्रयत्न शेख जावेद सरांनी केले , पत्रकारिता करतांना कोणतीही तडजोड न करता सरळ मार्गाने काम करुन शहरातील बँकेचे पिग्मी एजंट म्हणून करत आपला प्रपंच चालवतात.
कोरोनाच्या भिषण आपत्तीतही जीव धोक्यात घालून जावेद भाईंनी लोकांच्या मदतीसाठी या संकटकाळात बाधित लोकामध्ये आणि त्यांच्या नातेवाईकामध्ये
सकारात्मक उर्जा निर्माण केली आणि प्रशासनाला पुरक डिजिटल मिडिया या प्लॅटफार्म च्या माध्यमातून काम केले.पत्रकारितेची आवड व अन्यायाविरुद्ध पेठून उठण्याची वृतीने जावेद सर हे खुप कमी काळात प्रसिद्ध झाले. दिनदलितांचे शोषित वंचितांचे समस्या डिजिटल मिडिया च्या माध्यमातून मांडण्याची प्रेरणा
जेष्ट पत्रकार रवीश कुमार यांच्या कढून मिळाली असल्याचे ते सांगतात,पत्रकारिता करतांना कधीच स्वत चा उदो उदो करण्याचा त्यांचा स्वभाव नाही,
मवाळ शिस्तप्रिय ,मनमोकळेपणाने वागणारे पत्रकार म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते,जनमानसांत वावरतांना कधीच चुकीचे काम करत नसल्याने परिणामाची चिंता केली नाही,
ठाम विचार ठेवून प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक असल्याने कधीच कशाची ही भिती व पर्वा बाळगली नाही ते मराठवाडा युटुब न्युज चैनल,पोर्टलचे संपादक म्हणून सत्य बाजू मांडण्याचा प्रयत्न करित असतात.
कुणालाही न घाबरता कोणाच्या दबावाला बळी न पडता होणा-या परिणामाला समोरे जाण्याची ते ताकत ठेवतात,सत्य
पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांनी चांगले चागल्यांना जेरीस आणले असून आपल्या गोड स्वभावातून आपलसा करणारे जावेद भाईंनी अनेंक मुलींच्या लग्न कार्यात मदत मिळून देत सामाजिक कर्तव्य पार पाडले आहे. या प्रचंड ध्येयवादी, डेयरिंग बाज पत्रकार जावेद सरांचा काही दिवसापुर्वी वाढदिवस झाला असून त्यांना वाढदिवसा निमित्त कोटी कोटी शुभेच्छा…!