हिंदू धर्माने आम्हाला जसं शास्त्र शिकवले तसेच शस्त्र चालवने ही शिकवले – राष्ट्रीय श्रीराम संघ राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैय्या बेग
लाखो हिंदूंचे धर्मांतर करणाऱ्या मदर टेरेसांना भारतरत्न दिला जातो पण ज्यांनी भारताच्या स्वातंत्र्याबरोबरच धर्मांतराला विरोध करत धर्माचेही कार्य अंदमानच्या तुरुंगात राहून केले त्यांना भारतरत्न दिला जावा अशी मागणी आज हिंदूंना करावी लागत आहे हिच खूप मोठी शोकांतिका आहे.हिंदू धर्माने आम्हाला जसं शास्त्र शिकवले तसेच शस्त्र चालवायचेही शिकवले आहे.शस्त्र चालवणे आमच्यासाठी नवे नसून धर्मासाठी वेळ आल्यावर त्याचाही वापर केला जाईल असे रोखठोक सडेतोड मत राष्ट्रीय श्रीराम संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर भैय्या बेग यांनी मांडले आहे.* शिवजयंती निमित्ताने आयोजित केलेल्या धर्मसभेत हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या हिंदूं समोर सागर भैय्या बेग हे बोलत होते.आपल्या स्पष्ट व प्रभावशाली भाषणात त्यांनी पुढे म्हंटले की,हिंदू हा अनेक वर्षांपासून धर्मांतराचा शिकार होत आलेला आहे.ख्रिश्चन मिशनऱ्यांनी भारतावर राज्य केले तेंव्हा खूप मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर केले.धर्मांतरास विरोध करणाऱ्यांवर अनन्वित अत्याचार केले.ब्रिटिशांच्या या जुलमी राजवटीचा विरोध ज्यांनी केला त्यांना फासावर जावं लागलं तर स्वातंत्रवीर सावरकर यांनी काळ्यापाण्याची शिक्षा अंदमान बेटावर शिक्षा भोगत असतांना ब्रिटिशांच्या या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत धर्मांतराला विरोध केला.स्वातंत्र्यासाठी त्यांचा लढाही त्यांनी त्याच दरम्यान तीव्र करून ब्रिटिशांना हिंदूंची ताकद तेंव्हाच दाखवून दिली होती. सागर भैय्या बेग पुढे म्हणाले की,गेल्या सत्तर वर्षाच्या काळात हिंदूंवर काही कमी अत्याचार झालेले नाहीत, धर्माच्या नावाखाली भारताचे तुकडे करूनही भारतात हर जिहादी प्रवृत्ती दबा धरून त्यांचे प्रत्येक देशविघातक कृत्य छुप्या मार्गाने चालू असेल तर हिंदू आता काही झोपलेला नाही याची जाणीव जिहाद्यांनी ठेवावी.कारण आता जिहादी पोलीस स्टेशन पर्यंत धड चालत जाऊ शकणार नाही. त्यासाठी आमची टीम सदैव्य धर्मरक्षणासाठी तत्पर आहे.हिंदू मंदिरांना टार्गेट करणारा वक्फ बोर्ड रद्द करून त्यांच्या ताब्यातील तब्बल १७ लाख एकर जमीन मुक्त करून घ्यावी अशी मागणीही त्यांनी केली .एकट्या उत्तर नगर जिल्ह्यात अडीचशे एकर जमिनीवर जिहाद्यांनी कब्जा केला आहे त्यापैकी सोळा मालमत्ता या कानिफनाथ मंदिराच्या देवस्थानच्या मालकीच्या आहेत.हा अन्यायकारक वक्फ कायदा जिहाद्यांच्या मतांसाठी काँग्रेसने भारतावर लादला आहे तो अन्यायकारक कायदा रद्द करावा. तसेच हिंदू मुलींना बाटवण्याचे जिहाद्यांचे लव जिहाद हे षडयंत्र जोपर्यंत त्याविरुद्ध कडक कायदा होत नाही तोपर्यंत असाच चालू राहणार आहे हिंदुत्ववादी संघटनांमुळे त्यामध्ये कमी आहे.गोहत्या बंदी कायदा व्हावा अशीही संपूर्ण सनातनींची एकमुखी मागणी याप्रसंगी सागर बेग यांनी बोलून दाखवली. प्रचंड उत्साह आणि सहाच्या सभेला दुपारी चार वाजल्यापासूनच हिंदुप्रेमी,शिवप्रेमी जनता सभेच्या ठिकाणी गर्दी करू लागले होते.सभा निश्चित वेळेपेक्षा तासभर उशीराने सुरू झाली पण उपस्थितांचा उत्साह जराही ढळला नाही हे विशेष.प्रचंड घोषणाबाजी पुरुषांबरोबर महिलांनीही केल्याने वातावरण शिवमय झाले होते. कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या धर्मरक्षक ,गोरक्षक शरद भाऊ मोहोळ यांच्या धर्मपत्नी स्वाती ताई दोन महिन्यांपूर्वी समाजकंटकांनी पतीची हत्या केलेले दुःख मनी असतांनाही ते मनात दाबून त्यांनी दिलेल्या प्रभू श्रीरामाच्या घोषणा या प्रत्येक श्रीरामपूरकरांचे मन जिंकणाऱ्या ठरल्या.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते विश्वेश्वर स्वामी कोठारी यांचे मोजकेच पण शैलदार भाषणाने वातावरण तप्त झाले होते तर शिवचरित्रकार नवनाथ महाराज म्हस्के महाराज यांचेही याप्रसंगी भाषण झाले . धर्मसभा यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय श्रीराम संघाच्या असंख्य सदस्यांनी अहोरात्र परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन समीर माळवे यांनी केल्याने सभेला रौनक आली.
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.