ब्रेकिंग
धक्कादायक — ड्रिल मशीन चा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
गेवराई तालुक्यातील राहेरीत ड्रिल मशीन चा शॉक लागून तरुणाचा मृत्यू
गेवराई तालुक्यातील राहेरी येथे ड्रील मशिनच्या साह्याने सुतारकी चे काम करत असताना मशीन चे वायर कट होऊन करंट लागल्याने आज (दि. ३) रोजी सोमनाथ रायमल (वय वर्ष २२) या तरुणाच्या शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत माहिती अशी की सोमनाथ अभिमन्यू रायमल (वय २२) हे गेल्या कित्येक वर्षापासून सी तारखेचा व्यवसाय करत होते.
आज काम करत असताना दुपारी दोनच्या दरम्यान ड्रिल मशीन च्या साह्याने होल पाडत असताना अचानक ड्रिल ची वायर कट होऊन मशीनला चिटकल्याने व मशीन हातात असल्याने विजेचा करंट संपूर्ण शरीराला लागला. सदर तरुणाचा काम करत असतानाच विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला आहे. सदर तरुणाच्या मृत्यू बद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.