बिगर खिडकीच्या बस प्रवासासाठी वापरणे धोकेदायक
बिगर खिडकीच्या बस प्रवासासाठी वापरणे धोकेदायक (एसटी महामंडळाचा भोंगळ व रामभरोसे कारभार)
टाकळीभान प्रतिनिधी: एस टी महामंडळाने प्रवाशांसाठी तब्बल सलग दोन खिडक्या नसलेल्या बस मधून प्रवाशांची वाहतूक करत आहेत. सदर प्रवाशांची वाहतूक करताना श्रीरामपूर डेपोची ही बस टाकळीभान बस थांब्यावर येथील नागरिकांच्या निदर्शनास आली असून अशा बस मधून प्रवाशांची वाहतूक केल्यास प्रवाशांसाठी धोक्याची घंटा ठरू शकते.
सदर घटनेबद्दल प्रवासी व नागरिकांनी संताप व्यक्त केला असून ऐन दिवाळीच्या धामधुमीत एसटी महामंडळ सेवेचा असा भोंगळ व रामभरोसे कारभार पहावयास मिळत आहे.प्रवाशांमध्ये लहान बालके ,शालेय विद्यार्थी, वयस्कर जेष्ठ नागरिक, प्रवास करत असतात. व बसचा वेगही चांगला असतो. बस आदळल्यास किंवा बस थांब्यावर थांबल्यास प्रवाशांचा तोल जाऊन ते बाहेर पडू शकतात, अशा उघड्या खिडक्यांमुळे प्रवाशांना धोका उद्भवू शकतो. तरी एसटी महामंडळाने अशा नादुरुस्त बसेस प्रवाशांसाठी पाठवू नये, अचानक पणे काही आपत्कालीन घटना घडल्यास प्रवाशांच्या जीवितास धोका होऊ शकतो. बसेसची पूर्ण पाहणी करूनच बसेस पाठवाव्यात. या घटनेबद्दल प्रवासी वर्गातून महामंडळाच्या या भोंगळ व रामभरोसे सेवेबद्दल नाराजी व संताप व्यक्त करण्यात येत आहे