मातंग समाजातील युवकाचा निर्दयपणी झालेल्या हत्येचा निषेध
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
नगर -पुणे महामर्ग शिरूर येथे घोडनदी सतरा कमानी पुला वरती लहुजी शक्ती सेनेचा रस्ता रोको आंदोलन
मातंग समाजातील युवकाचा निर्दयपणी झालेल्या हत्येचा निषेध
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने नगर -पुणे महामर्ग शिरूर येथे घोडनदी सतरा कमानी पुला वरती रस्ता रोको आंदोलन करण्यात आले भर उन्हात डांबरी रस्त्यावरती लोटांगण घेत, प्रशासनाच्या नावाने बोंबा मारत भव्य रस्ता रोको आंदोलन लहुजी शक्ती सेना कोर कमिटी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड.हेमंत खंदारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, प्रामुख्याने आंदोलनामध्ये शिरुर,श्रीगोंदा तालुक्यातील लहुजी शक्ती सेना मातंग समाज बांधव यांच्यावतीने करण्यात आले. तत्पूर्वी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अहमदनगर जिल्हाधिकारी तसेच शिरूर श्रीगोंदा येथील तहसीलदार पोलिस प्रशासन यांना रस्ता रोको आंदोलनाचे निवेदन देण्यात आले होते. लहुजी शक्ती संघटनेने आंदोलन दुपारी एक वाजता चालू केले आंदोलन ठिकाणी शिरूर श्रीगोंदा येथील पोलिस प्रशासन घेऊन आंदोलनकांचे निवेदन घेऊन आंदोलन सोडवले.
सविस्तर वृत्त अशे कि 20 एप्रिल रोजी मनेश आव्हाड (वय 27 वर्षे)
मातंग समाजाच्या तरुणावर औरंगाबाद येथे चोरीच्या संशयावरून हल्ला करुन हात-पाय बांधून निर्दयीपणे लाकडी दांडक्याच्या जबर मारहाणीने खून करुन सदरील व्हिडिओ प्रसारमाध्यमांवर दहशत निर्माण करण्यासाठी पाठवला होता, तर या घटनेतील सर्व आरोपींना त्वरीत अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई,तसेच बहुतांश आरोपींना अटक करण्यात आलेली नसून ते फरार आहेत. या प्रकरणाने सर्व समाजाच्या भावना तीव्र असून, यामधील सर्व आरोपींना तात्काळ अटक करुन कठोर कायदेशीर कारवाई,आव्हाड कुटुंबाला शासनाने आर्थिक मदत करावी, काही आरोपींना ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा या सर्व मागणी करता नगर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला होता. लवकरात लवकर आरोपींना अटक करून सदरील केस फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवण्यात यावी प्रशासनाने तात्काळ दखल न घेतल्यास महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे यांच्या घरी मातोश्री वरती लहुजी शक्ती सेना व मातंग समाज घेरावा घालणार आहे, असे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले,
यावेळी प्रदेशाध्यक्ष कैलास खंदारे,विद्यार्थी आघाडी प्रदेशाध्यक्ष अॅड.हेमंत खंदारे,लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंदे,श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे,कार्याध्यक्ष राजाराम काळे,जिल्हा संघटक लखन साळवे, प्रवीण कुमार शेंडगे प्रकाश साळवे,वसंत औचिते,आप्पा रोकडे,अनिकेत शेंडगे,राजू मोटे,नंदू भाऊ ससाने, बंटी जोगदंड, नगरसेवक दादाभाऊ लोखंडे, प्रशांत औचिते,आबासाहेब बोरगे,अशोक चव्हाण, संदीप औचिते,सागर गायकवाड,मंगल पठारे, पुष्पा शेंडगे,संतोष गोरखे,तुषार गोरखे,नामदेव सकट,मोहन सकट,अमोल बोरगे,रामराव चव्हाण,योगेश मोटे, भाऊसाहेब औचिते, प्रशांत मोरे,राजु सकट,दादा सकट आदी समाज बांधव उपस्थित होते.