तिळापुर विविध सहकारी संस्था प्रकरण गेल हायकोर्टात
परिवर्तन शेतकरी विकास मंडळा पाठोपाठ श्री संगमेश्वर शेतकरी मंडळाचा हनुमान मंदिर येथे नारळ वाढवून प्रचारास सुरुवात.

तिळापुर विविध सहकारी संस्था प्रकरण अखेर गेल हायकोर्टात
तिळापुर वि.का.से.सहकारी संस्थेचा निवडणुकीचा बिगुल वाजला
परिवर्तन शेतकरी विकास मंडळा पाठोपाठ श्री संगमेश्वर शेतकरी मंडळाचा हनुमान मंदिर येथे नारळ वाढवून प्रचारास सुरुवात.
राहुरी तालुक्यातील तिळापुर येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची पंचवार्षिक व्यवस्थापक समितीची निवडणूक होणार असून निवडणूक रोमांचक होणार असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे. मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर काही मतदान कमी करण्यात आले तर काही मतदान वाढवण्यात आले होते, त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे. त्यावेळी परिवर्तन शेतकरी विकास मंडळाने अपिलात धाव घेऊन 31 मतदान सत्ताधारी गटाने चुकीच्या पद्धतीने कमी केल्याचे व 27 मतदान सत्ताधारी गटाने स्वतः वाढवले. हेच अपील मध्ये डीडीआर यांच्या निदर्शनात आणून दिल्याने कमी केलेले 31 मतदारांची नावे पुन्हा सामाविष्ट करण्यात आले. तसेच अवैधरीत्या 27 मतदारांची देखील नावे तसेच ठेवून मतदान याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असल्याकारणाने निवडणूकीत वेगळीच रंगत आलेली आहे. नवीन वाढवलेले 27 मतदार अशी आहे की 6 महिन्याच्या आतील सभासद आहेत. 2019 च्या ऑडिट मेमो मध्ये नावे नसतानाही मतदान यादीत नावे कसे आले. यावरून स्पष्ट दिसून येते की सत्ताधारी गटाने स्वतःचे मतदान कसे वाढवले ते डीडीआर अहमदनगर यांना माहिती पुरवल्याने ते मतदान कायम करण्यात आले असले तरी परिवर्तन शेतकरी विकास मंडळने हायकोर्टात धाव घेऊन दाखल करण्यात आले. त्यामुळे या 27 मतदारावर टांगती तलवार आहे. कोर्टात याचिका दाखल करून सर्व पुरावे सादर केलेले आहेत अशी माहिती परिवर्तन शेतकरी विकास मंडळाचे कार्यकर्ते यांनी दिल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा ऐकावयास मिळत आहे