महाराष्ट्र

… रस्ता चुकून महिला गेली थेट तिळापुरला

… रस्ता चुकून महिला गेली थेट तिळापुरला

राहुरी तालुक्यातील तिळापुर येथे संध्याकाळी सात वाजेच्या दरम्यान एक अनोळखी महिला परिसरात फिरत असल्याचे दिसल्याने गावातील डॉक्टर कोळेकर यांनी तिचे नाव गाव विचारले असतात तिला मराठी कळत नसल्याचे समजले.

डॉक्टर कोळेकर यांनी नारायण चोरमले यांना याबाबत फोनवर कळवले चोरमले हे रात्री आठ वाजता गावातील व् व्यक्तींनी महिलेला थांबून ठेवले त्या ठिकाणी धाव घेतली. त्या महिलेची संवाद केल्यावरून ती महिला पर राज्यातील बिहार मधील असल्याचे कळले ती कुठेतरी काम करण्यासाठी कुटुंबासह आलेली होती

 सदर महिला रस्ता चुकल्याने रस्त्याने आलेली आहे हे समजल्यावर चोरमले यांनी गावातील सरपंच हिरालाल जाधव व ग्रामपंचायत कर्मचारी हरिभाऊ आचपळे यांना ही माहिती देऊन पोलीस स्टेशनचे पीआय संजय ठेंगे यांच्याशी व कर्मचाऱ्यांशी संपर्क करत माहिती दिली. यावर पाहणी व कार्यवाही करण्याचे आदेश आल्याने पीसी शेळके व पीसी सोनटक्के हे रात्री बारा वाजता सदर ठिकाणी आले यावेळी गावातील सरपंच हिरालाल जाधव, हरिभाऊ आचपळे,  प्रमोद थोरात, माऊली थोरात, कोळेकर, राशिनकर हे त्या ठिकाणी थांबले होते त्यांनी त्या महिलेस जेवण दिले व राहुरी पोलीस कर्मचारी आल्यानंतर सदर महिले विचारपूस करून तिला पोलीस स्टेशन येथे घेऊन जाऊन कार्यवाही करून त्या महिलेस राहुरी येथील कृपा वृद्धाश्रमामध्ये ठेवण्यात आले. याबाबत पुढील तपास राहुरी पोलीस स्टेशन करत आहे कुणाला काही माहिती मिळण्यास संपर्क साधण्याचे राहुरी पोलिसांनी आवाहन केले आहे.

Rate this post
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे