टाकळीभान गावात छत्रपतींच्या मूर्तीस विरोध करणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय श्रीराम संघ मौदानात:-सागर बेग.

टाकळीभान गावात छत्रपतींच्या मूर्तीस विरोध करणाऱ्यांच्या विरोधात राष्ट्रीय श्रीराम संघ मौदानात:-सागर बेग.
श्रीरामपूर(प्रतिनिधी):- छत्रपतींच्या नावाखाली महाराष्ट्रात राजकारण करायचे आणि त्यांच्याच मूर्तीस गावगुंडांच्या आडून विरोध करायचा हे सेक्युलरी उपद्व्याप आता थांबले पाहिजेत.शासकीय बसस्थानक पाडून त्याजागेवर बेकायदा गाळे बांधुन दारू अड्डे चालवणाऱ्या गावगुंडांना पाठीशी घालायचे आणि गावात शिवप्रेमींनी स्थापीत केलेल्या महाराजांच्या मूर्तीस जर हे गावगुंड शासकीय अधिकाऱ्यांना पुढे करून विरोध करत असतील तर शिवप्रेमींच्या पाठीशी राष्ट्रीय श्रीराम संघ आपली ताकद उभी करेल असा परखड ईशारा शिवसेना नेते व राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष हिंदू धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांनी दिला आहे.
तालुक्यातील टाकळीभान हे गाव महामार्गावरील मोठे व प्राचीन गाव आहे बहुदा तालुक्याच्या राजकारणाला कलाटणी देण्याची ताकदही या गावात आहे.कारण पुरोगामी सेक्युलर हिंदूद्वेषी विचारांचा पगडा आजही काही अंशी गावात शिल्लक आहे आणि तोच पगडा आजच्या युवक पिढीच्या डोक्यात बसलेला असल्याने वादाला तेच कारण पुरेसे ठरत आहे.
गावात काही दिवसांपूर्वी तमाम हिंदूंचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हिंदू युवकांनी बसवली आणि तेथूनच विरोधाला सुरुवात झाली. गावातील चाळीस ते पन्नास शिवप्रेमीं युवकांनी आज श्रीरामपूर येथे धर्मरक्षक सागर भैय्या बेग यांची भेट घेऊन आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या.महामार्गावर पन्नास वर्षांपूर्वीचे जुने बसस्थानक शांतपणे बिनधास्त पाडून त्या शासकीय जागेवर आज गाळे दारू दुकान बांधण्यात आले व भाड्याने देऊन महिन्याला लाखो रुपयांचे मीटर चालू करणाऱ्यांच्या विरोधात तीन महिन्यांपूर्वी गावातील जागरूक शिवप्रेमीं नागरिकांनी आवाज उठवून उपोषण सुद्धा केले होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तेंव्हा कोणाच्या दबावाखाली कारवाई थांबवली ते आजही गुलदस्त्यात आहे पण शासकिय जागेवरील गाळ्यांच्या विरोधाच्या वेळी गोधडी घेऊन झोपलेले मात्र आज महाराजांच्या मूर्तीस विरोध करतांना दिसत आहेत आणि त्यांचे हेच कृत्य शिवप्रेमीं युवकांचे माथी भडकवणारे आहे.उपस्थित शिवप्रेमीं युवकांना शांत राहण्याचे आवाहन करत सागर बेग म्हणाले की,शासकीय बसस्थानक पाडून बेकायदा गाळे बांधणाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या शिवप्रेमीं युवकांच्या पाठीशी आम्ही तेंव्हाही होतो आजही आहे आणि बेकायदा गाळ्यांचा विषय आजही आपल्या डोक्यात आहे म्हणून विरोध करणाऱ्यांनी गैरसमज करून महाराजांच्या मूर्तीस विरोध केला तर जशास तसेच उत्तर देऊ असा ईशारा सागर बेग यांनी दिला आहे.धर्मरक्षक शिवप्रेमीं कार्यकर्त्यांना उद्देशून ते पुढे म्हणाले की चांगल्या कामासाठी आम्ही दिलेल्या ईशाऱ्यालाही विरोधक धमकी म्हणून वावडी उठवतात त्याचा आम्ही विचार करत नाही पण महाराजांच्या मूर्तीस कोणी विरोध करत असेल तर गाठ आमच्याशी असल्याचा सज्जड ईशाराही त्यांनी याप्रसंगी उपस्थित शिवप्रेमींशी बोलतांना विरोधकांना दिला आहे.


