एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा लग्न वाढदिवसाची सर्वत्र चर्चा?
एखाद्या चित्रपटाला लाजवेल अशा लग्न वाढदिवसाची सर्वत्र चर्चा?
राहुरी कृषी विद्यापाठ अभियंता डोखे याचेवर असलेले अनोखे प्रेमाचे दर्शन रुपेरी दुनये प्रमाणे साजरा झाला लग्नाचा वाढदिवस
आयोजनात खर्च झालेल्या लाखो रुपयाच्या शृंगाराने लक्ष वेधले अभियंता डोखे यांच्या लग्न वाढदिवसाच्या कार्यक्रमाची भव्यता पाहुन अनेकांना स्वप्न नगरीतले दृष्य अठवले रंगेबीरंगी विद्युत रोषणाईचा लखलखाट हातात पेय घेऊन स्मीतहस्य करत प्रत्येकाच्या हातात पेय पोहच करणाऱ्या सुंदरी मोठ मोठ्या स्क्रिन वर कार्यक्रमाच्या प्रदर्शनासह अभियंता डोखे यांचा मांडलेला जिवनपट डोखे यांचे नाते दर्शवनारे चित्रपटातील सुमधुर गाणे म्हणणारे गायक वेग वेगळ्या पद्धतीने तयार केलेले चविष्ट भोजन पेय, शितपेय याची मेजवाणी या वरून डोखे यांचे वरिल प्रेमीजनांचे अनोखे प्रेम या कार्यक्रमात दिसुन आले महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये अनेक अधिकारी आले आणी गेले अनेकांच्या ह्या जिल्ह्यातुन त्या जिल्हयात बदल्या झाल्या मात्र श्री डोखे यांचे अधिकारी आणी राजकीय नेते , ठेकेदार, यांचेशी असलेल्या अनोख्या संबंधांमुळे डोखे हे एकाच ठिकाणी आहेत नव्याने आलेले छोटे मोठे अधिकारी ठेकेदार यांना आपलेसे करून घेण्याची कला डोखे याचेकडे आहे आणी म्हणुनच डोखे गेली आकरा वर्ष अभियंता पदावर कायम आहे आणी म्हणुनच कि काय? डोखे यांची भव्यता त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या कार्यक्रमात दिसुन आली राहुरी शहरातील एका भव्य लॉन्स मध्ये झालेल्या लग्न वाढदिवसात जिल्ह्यातच नव्हे तर जिल्ह्या बाहेरही डोखे कुटुंबाची उंची वाढविल्याचे दर्शविण्यात आले संयोजकांनी डोखे कुंटुंबीयांचा केलेले मान सन्मान हा संयोजकाचे डोखे कुटुंबीया प्रती असलेले जिवलग प्रेम दर्शविनारे होते
या कार्यक्रमात विद्यापीठाचे अनेक अधिकारी आले नसल्याचे बोलले जात आहे मात्र यावेळी विद्यापीठातील सर्वच ठेकेदार मंडळी अवर्जुन उपस्थित होती असे समजते आणी त्यांनी डोखे यांचेवर भरभरून केलेला शुभेच्छाचा वर्षाव आतापर्यंत विद्यापीठातील कोणत्याही अधिकाऱ्याला लाभलेला दिसुन येत नाही यावरून श्री डोखे यांनी आपल्या शासकीय कार्यकाळा मध्ये अधिकारी , राजकीय नेते , ठेकेदार याचे मधे सोडलेली आगळी वेगळी छाप चर्चेचा विषय ठरत आहे अभियंता डोखे सारखा शासकीय अधिकान्याने तब्बल ११ वर्ष एकाच ठिकाणी काम करित निर्माण केलेले अपुलकीचे नाते चा कार्यक्रमात दिसुन येते भव्य दिव्य अशा लग्न वाढदिवसाच्या सिनेश्रृष्टीला लाजवेल अशा या सोहळ्यासाठी सुमारे २० ते २५ लाखांचा खर्च दिसुन आला डोखे यांचे अनोखे प्रेम विद्यापीठ प्रशासना सह इतर अधिकाऱ्यांच्या डोळ्यात भरणारे ठरले असले. तरी असे प्रेम इतर अधिकाऱ्यांना का मिळत नाही अशी चर्चा परिसरात होत आहे,
हा अवाढव्य खर्च अभियंता डोखे यांचा कि ठेकेदारांचा
राहुरी कृषी विद्यापीठ अभियंता म्हणुन बसविलेले डोखे यांची पात्रता नसताना त्यांना विद्यापीठ अभियंता पदावर बसविण्यात आल्याचे आरोप त्यांचेवर करण्यात आले त्यांचे विरुद्ध अनेक तक्रारी झाल्या न्यायालयातही त्याचे विरुद्ध काही निकाल देण्यात आले विद्यापीठातील अनेक अधिकाऱ्यानी तसेच सामाजीक कार्यकर्त्या नी डोखे यांचेवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले तसेच डोखे यांनी पुणे , नाशीक ,अहमदनगर सह अनेक ठिकाणी जागा खरेदी घेतल्या असल्याचेही काही कार्यकर्त्यानी तक्रारी करून सातबारा उताऱ्यांसह उघड केले विद्यापीठामध्ये कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा अरोप त्यांचेवर होऊनही त्यांचे कामकाजावर एकही डाग लागला नाही त्त्यांच्या लग्न वाढदिवसाच्या भव्य सोहळ्यावर खर्च झालेल्या २० ते २५ लाख रुपये हे डोखे यांचेवर असलेल ठेकेदाराचे प्रेमाचे प्रतीक असल्याची जोरदार चर्चा आहे