कृषीवार्ताब्रेकिंगमहाराष्ट्रसंपादकीय
कपाशी लागवडीसाठी तयार केलेल्या शेतात पावसाचे साचलेले पाणी.

कपाशी लागवडीसाठी तयार केलेल्या शेतात पावसाचे साचलेले पाणी.
टाकळीभान मध्ये पावसाची दमदार बॅटिंग
टाकळीभान ता.१४: गाव व परिसरात (ता.१३) रात्री नऊ वाजता पावसाने जोरदार बॅटिंग केली. दमदार पाऊस झाला असला तरी पेरणीसाठी अजून एका पावसाची गरज असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.
खरीप हंगाम सुरू झाला असून पावसासाठी शेतकऱ्यांचे आभाळाकडे लक्ष लागून होते. गेल्या आठ दिवसापासून ढगाळ वातावरण होते. सात-आठ जूनला पाऊस पडेल अशा अपेक्षेत असलेल्या शेतकऱ्यांचा हिरमोड होऊन पाऊस तब्बल आठ दिवस उशिरा पडला आहे. पेरणीसाठी शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. सोयाबीन, मका, कपाशी, बाजरी, मूग हे पिके प्रामुख्याने या भागात घेतली जातात. चालू वर्षी सोयाबीन पेरणीत मोठी वाढ होणार असल्याची शक्यता आहे. बी बियाणे व रासायनिक खते घेण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी दुकानात गर्दी केल्याचे चित्र पहावयास मिळाले आहे.