राहुरी तालुक्यातील कोपरे येथील आदिवासी समाजाच्या स्मशानभूमीवर गावातील धन दांडग्यांचे अतिक्रमण.

आदिवासी समाजाच्या स्मशानभूमी वर गावातील धन दांडग्यांचे अतिक्रमण.
राहुरी तालुक्यातील कोपरे गावातील गट नं. १३३ ग्रामपंचायत मालकीच्या क्षेत्रा मध्ये आदिवासी समाजाची २०० ×२०० स्मशानभूमी आहे १५० च्या आसपास कोपरे गावात आदिवासी समाज वास्तव्यास आहेत याच स्मशानभूमीत समाज पिढ्यानपिढ्या आपल्या मयत झालेल्या व्यक्तींवर अंत्यसंस्कार करत अलेले आहेत परंतु वाढती लोकसंख्या याचे परिणाम गावातील काही धनदांडगे लोक आता थेट आदिवासी स्मशानभूमीवर अतिक्रम करू लागले आहेत .
त्याचप्रमाणे हिच धनदांडगे लोक आदिवासींना त्या ठिकाणी अंत्यविधी साठी हरकत अडथळे निर्माण करु लागले आहेत याचा मनस्ताप आदिवासी समाजाला सोसावा लागत आहे या नियमित जाचास कंटाळून अखेर आपल्या न्याय हक्कासाठी एकलव्य आदिवासी क्रांती दल संघटनेच्या वतीने जिल्हा अध्यक्ष रवींद्र माळी यांनी स्मशानभूमीवरील अतिक्रमण काढून स्मशानभूमी मोकळी करून मिळावी या संदर्भात राहुरी तालुका येथील तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यात स्मशान भूमीवर अतिक्रमण करण्यासाठी सरपंच ग्रामसेवक सदस्य सदर अतिक्रमा विशयी वाद निर्माण होऊ नये ही भुमिका न घेता अतिक्रमण धारकांना पाठबळ देण्याचे काम करत आहे तसेच गाव नमुना रजिस्टर ८ अ ला मिळकत क्रमांक ३५५ स्मशानभूमी ची नोंद देखील आहे आदिवासी समाजावर होत असलेला अन्याय प्रशासकीय स्तरावरून सोडविण्यासाठी २२/९/२०२३ रोजी हे निवेदन देण्यात आले.
१५ दिवसात आदिवासी स्मशानभूमीवर अतिक्रमण विशयी प्रशासकीय स्तरावरून कार्यवाही करावी अन्यथा ९/१०/२०२३ रोजी एकलव्य आदिवासी क्रांती दल च्या वतीने राहुरी तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होणाऱ्या परिणामास ग्रामपंचायत पंचायत समिती व प्रशासन जबाबदार राहतील असे सांगण्यात आले माहितीस्तव माननीय जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर ,पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर ,गट विकास अधिकारी पंचायत समिती राहुरी ,पोलीस निरीक्षक कार्यालय राहुरी आदी ठिकाणी निवेदन देण्यात आली असून उद्याच्या उपोषणाच्या दिशेवरून न्याय हक्काच्या गोष्टी समोर येण्याची दाट शक्यता आहे. यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांनी ग्रामपंचायत आठवला नोंदी असल्याबाबत उतारे देण्यात आलेले आहे उताऱ्यावरती ग्रामसेवक यांच्या सह्या असल्याचे निवेदन करते यांनी सांगितले विना तारखेचेच उत्तरे देण्यात आले आहे असल्याचे निवेदन करते यांनी सांगितले त्यामुळे ग्रामपंचायत मध्ये गोलमाल सुरू आहे की सत्य परिस्थिती आहे हे येणारा काळच ठरू शकेल.याकडे कोपरे गावच नव्हे तर संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून आहे.