दफनभूमी कडे जाणाऱ्या रस्ता केला बंद
दफनभूमी कडे जाणाऱ्या रस्ता केला बंद
श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला दफनभूमी कडे जाणाऱ्या रस्ता बंद केला .गावा लगत असलेल्या स्मशानभूमीच्या रस्त्या लगत काही महिन्यांपासून सातववाडी ते अरणगाव दुमाला रस्त्याचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेजुन जवळपास साडेतीन कि.मी काम चालू आहे . कॉन्ट्रॅक्टर अक्षरशा: सामान्य माणसांच्या जीवाशी खेळू लागले, अशी चर्चा आहे .
सर्वधर्मीय स्मशानभूमीकडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरुम भरुण रस्ता उंचावला असून रात्री-अपरात्री दुर्दैवाने स्मशानात जाण्याची वेळ आली तर आधी गवत, झाडे , झुडपे बाजूला करावे लागणार व नंतरच प्रेत स्मशानात नेले जाईल अशी परिस्थिती आहे स्मशानभूमी म्हणजे काय तो रस्ता ..! काय ती स्वच्छता ..! काय ते गवत . .! काय ती झाडे … मात्र ग्रामपंचायत प्रशासन बघ्याची भुमिका घेत आहे .अजून असे किती दिवस चालणार .. ! गेली सहा महीने ग्रामपंचायतीवर प्रशासक आहे .
तथापि लवकरात लवकर दफनभूमी कडे जाणारा रस्त्याची, व स्मशानभुमी स्वच्छता करावी अशी मागणी ग्रामस्थांनी मागणी केली आहे.
स्मशानभूमी जवळून जाणारा रस्ता शत प्रतिशत एक विकासाचा भाग असला तरी पण रात्री अप रात्री अरणगाव ग्रामस्थांना स्मशानात जाण्या येण्यासाठी रस्त्याची सोय नसणे ही खेदजनक बाब आहे. समाजाच्या विकासासोबत जन सामान्यांना जर त्रास होत असेल तर तो रस्ता मानव जातीच्या कल्याणासाठी नसून खऱ्या अर्थाने स्मशानभूमीकडे घेऊन जाणारा आहे.
मीनाताई आढाव
जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अ.नगर