आषाढी वारी परतीचा प्रवास संपन्न माऊली समाधी मंदीरात विसावली*

*आषाढी वारी परतीचा प्रवास संपन्न माऊली समाधी मंदीरात विसावली*
*पुरातन हजेरी मारुती मंदिरात दिंड्याचे विणेकरी यांची हजेरी चोपदारांनी घेत दिंडी वारकरी ना दिला निरोप*
विठूनामाच्या गजरात काल माऊली न्नी अलंकापुरीत दाखल झाली याची देही याची डोळा हा सोहळा अनुभवयास मिळावा या साठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जनसागर उसळला होता, एकादशी च्या दिवशी पुरातन इतिहास असलेल्या हजेरी मारुती मंदिरात माउलींच्या पालखीचे आगमन झाले, आषाढी वारी परतीचा प्रवास संपन्न होण्यासाठी तसेच महिना भर पायी वीणा घेउन पंढरपूर आणि परत आळंदी ला येणाऱ्या वारकरी विनेकरी यांची नावे घेत हजेरी घेण्याची पुरातन परंपरा आहे, माऊलींचे चोपदार यादी नोद झालेली पाहत जे विनेकारी सुरवाती पासुन पायी चालत आहेत त्यांची त्यांची हजेरी घेतात , पुरातन हजेरी मारूती मंदिरा त हजेरी होते, आणि सोहळा समाप्ती ची घोषणा होते, त्याप्रमाणे हजेरी घेत थोरले बाजीराव पेशवा यांचे सावकार नाईक कुटुंबाच्या वतीने सदर नारळ वाटप होत असते, मानकऱ्यांची यादी चोपदार आणि स्थानिक जुने रखवालदार यांचे घरातील आरिफ भाई शेख हे अंतरिम स्वरुप देत मानाचे नारळ वाटप करण्याचे नियोजन करतात, त्या प्रमाणे नाईक घराण्यातील डॉ सत्यशील नाईक यांचे कुटुंबीय आणि आळंदीतील स्थानिक ग्रामस्थ असलेले आरीफ भाई शेख यांचे हस्ते नारळ वाटप केले जातात, हि जुनी वंशावळ परंपरा आहे, त्याप्रमाणे आजही केले जाते,तसेच आळंदी ग्रामस्थ यांचे वतीने कुऱ्हाडे कुटुंबाच्या वतीने ही दरवर्षी नारळ वाटप केले जातात, बाळ किसन कुऱ्हाडे, श्रीधर कुऱ्हाडे यांचे कुटुंबीय हे नारळ वाटतात, या कार्यक्रमा साठी विशेष व्यवस्था नव शिव शक्ती तरुण मंडळ यांचे वतीने केली जाते माजी नगराध्यक्ष राहुल चीतळकर आणि त्यांचे सर्व तरूण सहकारी हे काम पहात असतात,