शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय
शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय
टाकळीभान येथे थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 135 वी जयंती न्यू इंग्लिश स्कूल व अण्णासाहेब पटारे पाटील कनिष्ठ महाविद्यालय टाकळीभान येथे अण्णांच्या प्रतिमेची ढोल ताशांच्या गजरात मोठ्या जल्लोषात व उत्साहात मिरवणुक काढून साजरी करण्यात आली. विद्यालयाची झांज पथक व लेझीम पथक यांनी पंचक्रोशीतील सर्व गावकऱ्यांचे शिक्षण प्रेमींचे लक्ष वेधून घेतले.
याप्रसंगी विद्यालयाच प्राचार्य इंगळे बी. टी. ,मंजाबाप्पू थोरात, सरपंच अर्चना रणवरे उपसरपंच कान्होबा खंडागळे बाळासाहेब कोकणे, बापूसाहेब पटारे, किरण धुमाळ, सुभाष ब्राह्मणे , राहुल पटारे, राजेंद्र कोकणे ,पाराजी पटारे आदी. मान्यवरांच्या हस्ते प्रथम विद्यालयामध्ये कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी अण्णांच्या मिरवणुक रथा बरोबर विविधतेतून एकतेचे दर्शन घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, महात्मा फुले, पंडित नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, भगतसिंग, अहिल्याबाई होळकर, वकिल, डॉक्टर, शेतकरी राजा, क्रिकेटर, व्यापारी, शिक्षक, वैज्ञानिक व पोलिस इत्यादी वेगवेगळ्या क्षेत्रातील महापुरुषांच्या वेशभूषा धारण केल्या होत्या. त्यामध्ये इयत्ता दहावीची विद्यार्थिनी ऋतुजा पटारे हिने अण्णांच्या अर्धांगिनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांची वेशभूषा धारण केली होती तर इयत्ता नववीच्या तुवर प्रद्युम्न या विद्यार्थ्याने कर्मवीर भाऊरावांची वेशभुषा धारण केली होती.
अण्णांच्या रथाची मिरवणूक संपूर्ण गावातून मोठ्या जल्लोष काढण्यात आली. यावेळी गावातील नागरिकांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या तर महिला भगिनींनी घरासमोर रांगोळ्या काढून स्वागत केले व अण्णांच्या प्रतिमेचे पूजन व औक्षण केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. कर्मवीर अण्णांच्या मिरवणुकीसाठी भाऊराव केरू शिंदे पाटील यांनी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिला तर कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी ट्रॅक्टर सजावटीसाठी सहाय्य केले. मिरवणुकीनंतर सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या मिरवणुकीच्या नियोजनामध्ये सर्व शिक्षक वृंदांनी आणि कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी खूप सहकार्य केले.