टाकळीभान येथे कामगारदिनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
येथे टाकळीभान बांधकाम कामगार मंडळाच्या वतीने सर्व नोंदीनीकृत बांधकाम कामगारांना व त्याच्या सर्व कुटूंबातिल सदस्यासाठी त्यांच्या आरोग्य चिकित्सेसाठी, रक्ताच्या सर्व चाचण्या मोफत तपासणी शिबिराचे आयोजन दि. १ मे रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत स्वामी लॅबोरेटरी, बाजार समिती गेट जवळ टाकळीभान या ठिकाणी करण्यात आले होते. या आरोग्य शिबिरात तपासणी झाल्यानंतर कामगारांना प्रमाणपत्र वाटण्यात आले.या शिबिरात
सी.बी.सी. चाचणी रक्तातील साखरेची चाचणी, यकृत कार्य चाचण्या, रेनल (मूत्रपिंड) कार्य चाचण्या, लिपिड प्रोफाइल ,
मलेरिया, परजिवी, ESR, T3 T4 TSH,सिरम लोह ,GGTP ,मॅग्नेशियम
इत्यादी. रक्त तपासणी चाचण्या पुर्णपणे मोफत करण्यात आल्या. आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात मोठ्या संख्येने नोंदणीकृत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी लाभ घेतला.शिबिरासाठी साठी डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, दिपक गांगुर्डे यांनी सेवा दिली. कार्यक्रम प्रसंगी कामगार नेते प्रताप लोखंडे मुकुंद हापसे,नारायण काळे,श्रीकृष्ण वेताळ,भारत गुंजाळ,गजानन लोखंडे, संजय जेजुरकर, विजय गटकळ,सागर सोनवणे ,उत्तम लोखंडे,राजू बेलदार मिस्तरी आदीसह शिबिरार्थी उपस्थित होते .