ब्रेकिंगमहाराष्ट्र

राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या नेतृत्वाखाली दि.5 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली जंतरमंतर या ठिकाणी भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणना करण्यात यावी मागणी.

राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या नेतृत्वाखाली दि.5 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली जंतरमंतर या ठिकाणी भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणना करण्यात यावी मागणी.

राष्ट्रीय समाज पक्ष आयोजित भव्य एक दिवसीय धरणे आंदोलन ओबीसी आरक्षण व जातनिहाय जनगणना करण्यात यावी या मागणीसाठी माजी मंत्री महादेवजी जानकर राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांच्या नेतृत्वाखाली दि.5 ऑगस्ट 2022 रोजी दिल्ली जंतरमंतर या ठिकाणी राष्ट्रीय समाज्याच्या न्याय हक्कासाठी सरकार ने जाणून बुजून दुर्लक्षतीत ठेवलेली जात निहाय जनगणना करण्यात यावी व ओबीसी चे रखडलेले आरक्षण अबादित करावे या प्रमुख मागण्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी व झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला जागे करण्यासाठी सर्व समाज्यातील जनता सरकारला जाब विचारण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचे अहमदनगर (उत्तर)जिल्हा नियोजन बैठकित सांगण्यात आले व आंदोलनच्या तयारीसाठी राहुरी येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यलायत आढावा घेण्यात आला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते व मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सलगर यांच्या आदेशाने राज्यकार्यकरिणी सदस्य सय्यदबाबा शेख,उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदराव बाचकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले .सय्यदबाबा यांनी सांगितले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनामधील संविधानात्मक अधिकार आम्हाला मिळाला नाही तर तो हिसकावून घेतल्या शिवय रासप सैनिक शांत बसणार नाही, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष शरदराव बाचकर यांनी मा. जानकर साहेब यानी सर्व समाजातील उपेक्षित वंचित घटकांनी आपल्या न्याय हक्क मिळावा म्हूणन जीवन समर्पित केले आहे आपल्या सर्वाच्या हक्कासाठी आंदोलनात सहभागी व्हावे यासाठी अहमदनगर बरोबरच , नाशिक, धुळे,जळगाव,मालेगाव,नंदुरबार उत्तर महाराष्ट्रतुन हजारोच्या संख्येने कार्यकर्ते दिल्ली येथे उपस्थितीत राहणार असल्याचे सांगितले तर जिल्हाध्यक्ष नानासाहेब जुंधारे यांनी मा.जानकर साहेब पशुसंवर्धन मंत्री असताना सर्व प्राण्यांची जनगणना केली होती पण सरकारला माणसाची जनगणना होत नाही हेच फार दुर्दैव असल्याचे म्हटले अहमदनगर जिल्ह्यातील सर्व आघाड्यांचे तालुका जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी अंदोलनात सहभागी होण्याचे अवहान केले 

 यावेळी जिल्हाउपाध्यक्ष दत्तात्रय कचरे,महिला जिल्हाध्यक्ष सुवर्णाताई जर्हाड,नेवासा विधानसभा अध्यक्ष संतोष काळेसर, श्रीरामपूर तालुकाध्यक्ष नंदकुमार खेमनर, संगमनेर तालुकाध्यक्ष सोपान तांबडे,राहुरी तालुकाध्यक्ष शिवाजी सरक राहुरी महिला तालुकाध्यक्ष सौ. रेखा नरवडे आदींनी आपल्या मनोगतामध्ये तालुक्यातून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. यावेळी नानासाहेब जगताप,विलासदादा सैंदोरे,कपिल लाटे, मालूजी तिखोळे,सुभाष मते, रविंद्र औताडे, प्रमोद मुळे,बाळासाहेब विटनोर,बाळासाहेब वावरे,सुभाष विटनोर,करण माळी, सुरेश गायके, भारत जाधव,अभिमन्यू बाचकर मीननाथ बाचकर, राजेंद्र पाटील वराळे,भारत हापसे आदी कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन यशवंत गाडे यांनी तर उपस्थितांचे आभार उमेश बाचकर यांनी मानले.

Rate this post
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे