ब्रेकिंगमहाराष्ट्र
आळंदीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आळंदीच्या हजेरी मारुती मंदिर चौकात आले नदीचे स्वरूप*
*आळंदीत मेघगर्जनेसह जोरदार पाऊस आळंदीच्या हजेरी मारुती मंदिर चौकात आले नदीचे स्वरूप*
आळंदी देवाची येथे आज दिवसभर मोठा उकाडा जाणवत होता, अंगाची लाहीलाही होणारी गर्मीने त्रासलेले नागरिकांना आज वातावरणात थंडक निर्माण झाल्याने चेहऱ्यावर त्रासलेले मात्र स्मित हास्य आलेले दिसले आहे, दुपारी तीन नंतर ढग दाटून आले आणि हलकेसे वाऱ्यासह पावसाची रिमझिम चालू झाली थोड्याच वेळाने मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटा जोरदार पावसाला सुरुवात झाली सुमारे तास दोन तास पाडणाऱ्या पावसामुळे आळंदीत नदीचे स्वरूप प्राप्त झाले. समुद्री लाटा यावेत त्याप्रमाणे लाटांचा अनुभव नागरिकांनी अनुभवला अचानक आलेल्या पावसाने भाविकांची नागरिकांची तारांबळ उडाली आहे पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही अशी परिस्थिती असताना रस्ते मात्र पाण्याने चकाचक झालेले आहेत वाहत्या पाण्याचे स्वरूप पाहता नदीसारखी परिस्थिती मोठ्या मोठ्या चौकामध्ये नागरिकांना अनुभवायला मिळाली