देश-विदेशनोकरीमहाराष्ट्र
टाकळीभानचा भुमिपुञ मेजर बंडोपंत माळवदे यांचा दिल्लीत गौरव.

टाकळीभानचा भुमिपुञ मेजर बंडोपंत माळवदे यांचा दिल्लीत गौरव.
टाकळीभानचे भुमिपुञ व सध्या भारतीय सैन्यदलात सेवेत आसलेले बंडोपंत रामनाथ माळवदे यांना पोलिस प्रशिक्षण केंद्रातील उत्कृष्ठ कामगिरी बद्दल केंद्रिय गृहमंञालयाच्या वतीने नुकतेच ९ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे पुरस्कार देवुन सन्मानित करण्यात आले आहे. माळवदे हे सध्या भोपाळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात हवालदार या पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल केंद्रिय गृहमंञालायाने घेवुन केंद्रिय गृहमंञी अमित शहा यांच्या स्वाक्षरीचे सन्मान चिन्ह व प्रशस्ती पञक केंद्रिय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांच्या शुभहस्ते देवुन गौरवण्यात आले आहे. टाकळीभान सारख्या खेड्यातील व एका गरीब कुटुंबातील व्यक्तिचा दिल्लीत गौरव होण्याची ही पहीलीच घटना आहे. मेजर माळवदे यांच्या या गौरवाचे टाकळीभान व पंचक्रोशित स्वागत होत आसुन त्यांचे आभिनंदन केले जात आहे.