टाकळीभान येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.
टाकळीभान येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा.
श्रीरामपूर तालूक्यातील टाकळीभान येथील पुरातन श्रीराम मंदिरात आज दिनांक १० रोजी दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
श्रीराम मंदिरात गुढी पाडवा ते श्रीराम नवमी या दरम्यान श्रीराम नवमी उत्सव साजरा केला जातो. या निमित्त हारीपाठ, भजन, अखंड हरीनाम सप्ताह आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम नवमी निमित्त सकाळी ६ वाजता प्रभू श्री रामचंद्रांना गंगाजलाने स्नान व अभिषेक करण्यात आला. सकाळी ९ ते ११ या दरम्यान दिंडी काढण्यात आली. दिंडीची ग्राम प्रदक्षिणा झाल्यावर ११ते १२ या दरम्यान भजन होवून दुपारी १२ वाजता पाळण्याची दोरी ओढून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. जन्मानंतर भाविकांनी फुलांची उधळन करून प्रभू रामचंद्रकी जयचा जय जयकार केला. नंतर आरती होवून भाविकांना प्रसाद देण्यात आला.
श्रीराम नवमी निमित्त श्रीरामाच्या दर्शनासाठी व जन्मोत्सावासाठी मंदिरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती. श्रीराम नवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यासाठी मंदिराचे प्रमुख डाॅ. श्रीकांत भालेराव,डाॅ. सोनल भालेराव, डाॅ. प्रसाद भालेराव, सामाजिक कार्यकर्त्या सुप्रिया धुमाळ महिला व पुरूष भजनी मंडळ व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.
टाकळीभान— येथील पुरातन श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. पाळण्याची दोरी ओढून जन्मोत्सव साजरा करण्यात आला