टाकळीभान येथील६० वर्षांवरील १५० वयोवृद्ध नागरिकांना भाजपाच्या वतीने साहित्य वाटप

टाकळीभान येथील६० वर्षांवरील १५० वयोवृद्ध नागरिकांना भाजपाच्या वतीने साहित्य वाटप
नागरिकांना विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय व विभाग भारत सरकार यांचे वतीने राष्ट्रीय वयोश्री योजने अंतर्गत येथील भाजपाच्या वतीने टाकळीभान
येथील ६० वर्षांवरील १५० वयोवृद्ध नागरिकांना चाकांची घडीची खुर्ची, काठी, श्रवण यंत्र, चष्मा, वाॅकर, कुबड्या, कृत्रीम दात, मान, पाठ, गुडघ्यांचा पट्टा आदी साहित्यांचे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी माजी सभापती नानासाहेब पवार, युवा नेते भाऊसाहेब पवार, अविनाश लोखंडे, बंडोपंत हापसे, नारायण काळे, अनिल दाभाडे, माजी सरपंच बंडू पटारे, राजेंद्र रणनवरे, शंकर शिंदे, संजय पवार, बाळासाहेब शेळके, बाळासाहेब तुवर, पप्पू रणनवरे, चंद्रकांत थोरात व वयोवृद्ध लाभार्थी उपस्थित होते.
टाकळीभान— येथील १५० वयोवृद्धांना भाजपाच्या वतीने विविध साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी नानासाहेब पवार, अविनाश लोखंडे, नारायणकाळे, बंडोपंत हापसे, भाऊसाहेब पवार आदी.