रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या अध्यक्षपदी नगरसेवक रो. अभय बोरा यांची नियुक्ती
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या अध्यक्षपदी नगरसेवक रो. अभय बोरा यांची नियुक्ती
कर्जत प्रतिनिधी – रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाज कार्याच्या नविन वर्षाची सुरुवात नेहमी प्रमाणे १ जुलै पासून होते .
सन २०२२-२३ या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या नुतन पदाधिकाऱ्यांच्या निवड करुन कार्यकाल सुरू होतो .
या वेळी रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या अध्यक्षपदी कर्जत नगरपंचायतचे नगरसेवक रो. अभय बोरा यांची एकमताने निवड करण्यात आली. तर सेक्रेटरी म्हणून रो.प्रा.सचिन धांडे यांची नियुक्ती करण्यात आली. इतर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे ट्रेझरर रविंद्र राऊत सर , सार्जंट ॲट आर्मस् रो.राहुल खराडे, क्लब ॲडमिनिस्ट्रेशन चिफ रो.संतोष सुरवसे , व्हाइस प्रेसिडेंट रो.संदिप गदादे. यांच्या निवड करण्यात आल्या आहेत. या सर्व नुतन पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली या चालु वर्षीचे कामकाज पार पडणार असल्याची माहिती नुतन अध्यक्ष अभय बोरा यांनी दिली .
या निवडी साठी चार्टर्ड प्रेसिडेंट रो.डाॅ.संदिप काळदाते,पास्ट प्रेसिडेंट रो .राजेंद्र सुपेकर साहेब, रो .नितिन देशमुख,रो .नितिन तोरडमल,रो.प्रा .विशाल मेहेत्रे,रो.रामदास काळदाते आदी उपस्थित होते. तसेच या सर्व माजी अध्यक्षांचे मार्गदर्शन नुतन सदस्यांना लाभणार आहे. तसेच सर्व रोटरी सदस्यांच्या सहकार्यातून हे वर्ष ऐतिहासिक कामगिरी करेल असा विश्वास बोरा यांनी व्यक्त केला आहे.
रोटरी क्लब ऑफ कर्जत सिटीच्या वतीने पुढे जास्तीत जास्त समाजोपयोगी कामे पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्व कटीबद्ध आहोत असे आश्वासन नुतन पदाधिकारी यांनी सांगितले .