धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष पदी दताञय खेमनर यांची निवड
धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष पदी दताञय खेमनर यांची निवड
- धनगर समाज संघर्ष समिती जिल्हा अध्यक्ष पदी दताञय खेमनर यांची निवड
श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायत मा सदस्य तथा भाजपा भटके विमुक्त युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष दताञय खेमनर यांची धनगर समाज संघर्ष समितीच्या उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष पदी धनगर समाज समाज संघर्ष समिती संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ विकास महात्मे व प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांच्या हस्ते संभाजीनगर येथील सुभेदार विश्रांतीगृह येथे नियुक्ती पञ देऊ निवड करण्यात आली दताञय खेमनर हे धनगर समाज संघर्ष समिती ची स्थापन झाल्यापासुन दहा वर्षे धनगर समाज संघर्ष समिती मध्ये काम करत आहे. ते सन २०१२ ते २०१७ नगर जिल्हा अध्यक्ष पद सांभाळ होते .सन २०१८ मध्ये त्या वरती उत्तर महाराष्ट्र संघटक पदाची जबाबदारी देण्यात आली होती. त्यांनी उत्तर महाराष्ट्र संघटक असताना देखिल समितीचे काम चांगले केले आहे .दत्ताञय खेमनर यांनी धनगर समाज संघर्ष समितीचे काम अहमदनगर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढवले. तसेच धनगर समाज संघर्ष समितीच्या सर्व आंदोलन व मोर्चा मध्ये सक्रिय सहभाग घेतला. मेंढपाळावर हल्ला झाला, तरी देखील तात्काळ आवाज उठवतात म्हणून त्यांची पुन्हा उत्तर नगर जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली अशी माहिती प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांनी दिली. यावेळी युवा प्रदेश अध्यक्ष जालना दिपक बोरुडे ,औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष रंगानाथ राठोड ,बाळासाहेब जानराव परभणी जिल्हा अध्यक्ष, अनंत बनसोडे जालना जिल्हा कपिल दहेकर ,अरुणभाऊ रोडगे, अमोल बुटे, नितिन साळे ,जालिंदर रोडे, दताञय हाळनोर, सतिष सोडणार, मनोज भिसे आदी उपस्थित होते. तसेच दताञय खेमनर यांची नगर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल भाजप नेते आमदार राधाकृष्ण विखे पाटील ,भाजपा प्रदेश उपाध्यक्ष प्रा राम शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले ,सभापती दिपक पटारे ,उपसभापती बाळासाहेब तोरणे , महंत अरूणनाथगिरीजी महाराज ,हिंदु धर्मवीर सागर भैया बेग ,अखिल भारतीय मानवाधिकार मिशन जिल्हाध्यक्ष धनंजय माने यांनी निवड झाल्या बद्दल अभिनंदन केले यावेळी नुतन जिल्हा अध्यक्ष दताञय खेमनर यांनी सांगितले की संस्थापक अध्यक्ष खासदार डॉ विकास महात्मे व प्रदेश अध्यक्ष बापुसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्यामध्ये धनगर समाज संघर्ष समिती गाव तेथे पोचवणार आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे.