राजकिय

शिरसगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी गाजवली

पूर्वीचे आणि आत्ताचे एकाच माळेचे मणी :-रोहित यादव

शिरसगाव ग्रामपंचायतीची ग्रामसभा राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी गाजवली

पूर्वीचे आणि आत्ताचे एकाच माळेचे मणी :-रोहित यादव

 

 

*श्रीरामपूर (प्रतिनिधी):- गावातील तमाम हिंदू ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री खंडोबा मंदिराला विरोध आणि अनधिकृत मस्जिद प्रश्नाबाबत शिरसगाव ग्रामपंचायत मधील सत्ताधारी गप पडायची गोळी घेत असतील तर त्यांच्या अशा दुटप्पी भूमिकेला राष्ट्रीय श्रीराम संघ कडाडून विरोध करून त्यांना स्वस्थ बसू देणार नसल्याचा ईशारा शिरसगाव शाखा अध्यक्ष रोहित यादव यांनी दिला आहे.*

 

       राष्ट्रीय श्रीराम संघांचे शिरसगावचे अध्यक्ष रोहित दिनकर यादव यांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत गावातील जलजीवन पाणी योजना व खंडोबा मंदिराचा प्रश्न उपस्थित करत ग्रामपंचायत हद्दीतील अनधिकृत मशीदी आणि दर्ग्याबाबत बाबत आक्रमक भूमिका घेत सत्ताधाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

 

         दरवर्षी स्वातंत्र दिनाच्या दिवशी लोकहिताच्या प्रश्नाबाबत गावात ग्रामसभा भरत असते परंतु राष्ट्रीय श्रीराम संघ आक्रमक असल्याची कुणकुण लागल्याने त्यादिवशीची नियोजित ग्रामसभा सहा दिवस उशिराने भरवण्यात आली ती सभाही वादळी आणि सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडणारी ठरली.

 

       गुरुवारी दि.२१ रोजी हनुमान मंदिर सभा मंडपात झालेल्या ग्रामसभेत प्रचंड गदारोळ बघायला मिळाला.सभेच्या सुरवातीलाच ग्रामपंचायत सदस्य महेश ताके यांनी सरपंच हजर असताना सभेचे अध्यक्षपद दुसऱ्याने घेतल्याने आक्षेप घेतला त्यामुळे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले.त्यानंतर राष्ट्रीय श्रीराम संघाचे कार्यकर्ते निलेश गवारे यांनी जलजीवन योजनेचे पाणी खराब येत असलेबाबत उपास्थित केलेल्या प्रश्नावर अपेक्षित उत्तर मिळत नसल्याने परत सभेत गोंधळ उडाला.निलेश गवारे यांच्या मागणीनुसार जो पर्यंत पिण्यायोग्य पाणी येत नाही तो पर्यंत पाणीपट्टी कुणीही भरणार नाही असे ठणकावून सांगितले.तसेच गावातील गोर गरीब जनता नाईलाजाने दर महिन्याला सहाशे रुपयाचे जारचे पाणी विकत घेते असे असेल तर ग्रामपंचायतीला पाणीपट्टी मागण्याचा नैतिक अधिकार काय असा सवालही त्यावेळी उपस्थित करण्यात आला.गेल्या पाच वर्षापासून शिरसगाव च्या जनतेला पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण तयार झालेले आहे.सत्ताधारी व सत्ता भोगून गेलेले फक्त आरोप प्रत्यारोप करतात अशा संतप्त प्रतिक्रिया निलेश गवारे व महेश ताके यांनी व्यक्त केल्या.

 

          राष्ट्रीय श्रीराम संघांचे शिरसगाव अध्यक्ष रोहित यादव यांनी अनधिकृत असलेल्या तीन मस्जिद व नव्याने ग्रामपंचायत शेजारी झालेल्या मस्जिद बांधकामावर प्रश्न उपस्थित केल्यावर एकच गोंधळ उडला.सर्वसामान्य जनतेला काही बांधकाम करायचे असल्यास पहिले बांधकाम परवाना घ्यावा लागतो मग मस्जिद बांधकाम करायला ग्रामपंचायत ने परवानगी का दिली असा प्रश्न रोहित यादव यांनी उपस्थित केला.ग्रामपंचायतीचा कारभार पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालतो,राज्यात हिंदुत्ववादी सरकार आहे तरी श्रेयवादासाठी श्री खंडोबा मंदिराला विरोध कारायचा खटाटोप जर कोणी करत असेल तर यापूढे आक्रमक भूमिकेतच आवाज उठवला जाईल असा ईशाराही रोहित यादव यांनी भर ग्रामसभेत दिल्याने ग्रामस्थांनी त्यास टाळ्या वाजवून आपला पाठींबा व्यक्त केला.याप्रसंगी ग्रामपंचायत सत्ताधारी व रोहित यादव,कानिफनाथ यादव यांच्यात बाचाबाची बघायला मिळाली.

 

        *पूर्वी सत्ता भोगून गेलेल्यांनी महाराणा प्रताप सोसायटी मधील मुळ सभासदांचे प्लॉट विकले तर सरकारी जमिनीवर अनधिकृत बंगले बांधून त्यांची बेकायदेशीर विक्री केली म्हणून त्यांना वैतागून ग्रामस्थांनी सत्ता बदल केला पण हे नवीन सत्ताधारी देखील त्यांच्या सारखेच गावाचे वाटोळं करत आहे असा आरोप रोहित यादव व कानिफनाथ यादव यांनी केला.*

 

      सभेच्या अध्यक्षाला विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाला सत्तेतील काही सदस्यांनी मुद्दामहुन उलटसुलट उत्तर दिल्यामुळे सभेत प्रचंड तणावाचे वातावरण तयार झाले होते.येणाऱ्या काळात ग्रामपंचायत मधे चालू असलेला काळा कारभार व त्यांच्यात आलेला सत्तेचा माज संपुष्ठात आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराच राष्ट्रीय श्रीराम संघाच्या कार्यकर्त्यांनी दिला आहे.

4.5/5 - (2 votes)
Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Rudraa News

या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख रुद्रा न्यूज चे माननीय मुख्य संपादक यांनी प्रसारित केले असून ते प्रत्येक मताशी सहमत असतीलच असे नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे