अफवांना बळी न पडता शिवसेनेच्याच उमेदवारांना निवडून द्या- सागर बेग

अफवांना बळी न पडता शिवसेनेच्याच उमेदवारांना निवडून द्या- सागर बेग
*श्रीरामपूर (प्रतिनिधी):- पालिका निवडणुकीत सध्या अफ़वा मोठ्या प्रमाणात पसरवून मतदारांना फसवण्याचे काम चालू आहे.धर्मरक्षक सागर बेग हे शिंदे शिवसेना सोडून भाजपात जाणार अशा खोट्या व अफ़वा पसरवणाऱ्या बातम्या सोशल मिडियावर व काही चॅनलवर दिल्या जात आहेत त्या बातम्या धांदात खोट्या आणि संभ्रम निर्माण करणाऱ्या असल्याचा खुलासा धर्मरक्षक सागर बेग यांनी केला आहे.*
आपल्याबाबत सध्या पसरवल्या जात असलेल्या अफ़वा बाबत धर्मरक्षक सागर बेग यांनी खुलासा केला की,शहरातील मुस्लिम मोहल्ल्यातील तीन हाजी काँग्रेस सत्तेत यावी म्हणून एक झाले आहेत तसेच हिंदूंनी देखील एकजूटता दाखवून हिंदू हिताच्या राजकीय पक्षाना बळकटी दिली पाहिजे म्हणून मी शिंदे शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतलेला होता आणि त्यानुसार शिंदे यांच्या हिंदू विचारांशी एकनिष्ठ राहून शिंदे शिवसेनेत आजही आपले धर्मकार्य प्रामाणिकपणे करत आहे.परंतु माझ्या बाबतीत जनतेत संभ्रम निर्माण होऊन त्याचा फायदा काँग्रेसला व्हावा अशी कपटनीती विरोधकांनी चालवली असून ती चुकीची आणि धांदात खोटी अशी आहे जनतेने देखील अशा अफवांना बळी न पडता शिवसेनेच्या उमेदवारांना निवडून देण्याचे आवाहन सागर बेग यांनी केले आहे.



