टाकळीभान येथे विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन.
टाकळीभान येथे विविध विकास कामांना निधी उपलब्ध व्हावा म्हणून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन.
टाकळीभान येथील विकासकामा बाबत महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री नामदार राधाकृष्ण पा.विखे यांची श्रीरामपुर येथील कार्यक्रमात भेट घेऊन विकास कामाबाबत निधी मिळावा यासाठी निवेदन देण्यात आले व .महसुल मंत्री,नामदार राधाकृष्ण पा.विखे यांचा टाकळीभान ग्रामपंचायत व टाकळीभान ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यातआला,
याप्रसंगी माजी सभापती दिपक आण्णा पटारे,माजी सभापती नानासाहेब पवार,माजी सरपंच मंजाबापु थोरात,उपसरपंच कान्हा .खंडागळे,जयकर मगर सर,lllमेजर विनोद रणनवरे,.अभिमन्यु मगर,.मोहन रणनवरे,.सुंदर रणनवरे,शंकर रणनवरे उपस्थित होते
टाकळीभान कमान ते घोगरगाव ओढा/ पुलापर्यंत रस्ता दुहेरी कामासाठी निधी मिळावा सदर रस्ता दुहेरी करुन,सदर रस्त्यावर दूभाजक व दिवाबत्तीची सुविधा निर्माण करावी आणि रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी पावसाचे पाणी जाण्यास साईड भूमिगत गटार यासाठी निधीची मागणी करण्यात आली जिल्हा वार्षिक योजनेतुनगावांतर्गत पेव्हिंग ब्लाॅक बसविणे ,स्मशान भूमी सुशोभिकरण करणे
महादेव मंदिर परिसरात बहुउद्देशीय सभागृह बांधणे यासाठी निधीची मागणी करण्यात आली.
अनु.जाती व नवबुध्द वस्तीचा विकास करणे. सन २०२२ – २३ या आर्थिक वर्षाच्या प्रस्तावास निधी १२ दलित वस्तीसाठी मिळण्याबाबत मागणी करण्यात आली.
प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभान मध्ये वैद्यकीय अधिकारी पद क्रमांक २ मंजुरी मिळण्याबाबत मागणी करण्यात आली.प्राथमिक आरोग्य केंद्र टाकळीभानला जिल्हा नियोजन समिती अंतर्गत 108 रुग्णवाहिका मंजूर व्हावी जेणेकरुन आस- पासचे खेडे गावातील रुग्णांना तातडीने रुग्णसेवेचा लाभ मिळेल या मागणीचे निवेदन देण्यात आले असून सदर कामांचा पाठपुरावा करुन वरिल विकासकामे गावात राबविण्यात येणार असल्याचे उपसरपंच कान्हा खंडागळे यांनी सांगितले