ब्रेकिंग
टाकळीभान येथे भाजपाच्या वतीने सुदृढ बालक स्पर्धा संपन्न.
टाकळीभान येथे भाजपाच्या वतीने सुदृढ बालक स्पर्धा संपन्न.
देशाचे बालक सुदृढ असेल ,तर देश बलवान असतो म्हणून सुदृढ बाळांसाठी पोषण आहार फार महत्वाचा असून मुलांचे सामर्थ्य व क्षमता यामध्ये पोषण आहाराची सर्वात महत्वपूर्ण भूमिका असल्याने बालकांना पोषण आहार देवून सुदृढ ठेवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन भाजपाचे श्रीरामपूर तालूका अध्यक्ष बबनराव मुठे यांनी केले.
टाकळीभान येथील श्री. संत सावता महाराज मंदिरात भारतीय जनता पार्टी टाकळीभान यांचे वतीने
सुदृढ बालक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी मुठे अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.
यावेळी टाकळीभान प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. शुभांगी खेडकर, समद शेख,
भाजपाचे विशाल यादव, दत्तात्रय जाधव, रूपेश हरकल, लखन उपाध्ये, बंडोपंत हापसे, नारायण काळे
विलास पटारे अंगणवाडी सेविका व मदतनिस उपस्थित होते.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकिय अधिकारी डाॅ. शुभांगी खेडकर व समद शेख यांनी
पोषण आहार, गरोदरपणात घ्यावयाची काळजी या
विषयी माहिती विषद केली. नारायण काळे यांनी या
कार्यक्रमाची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन बंडोपंत
हापसे यांनी केले.
यावेळी सुदृढ बालक स्पर्धेतील बालकांना एक, दोन, तीन क्रमांकानुसार बक्षिस वाटप मान्यवरांच्या
हस्ते करण्यात आले. व कुपोषित बालक यादी तयार करून प्रधानमंत्री पक्ष कार्यालयाला पाठविण्यात आली. तसेच अंगणवाडी सेविकांच्या वतीने भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला.
टाकळीभान —येथील भाजपाच्या वतीने सुदृढ बालक
स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालूका
अध्यक्ष बबनराव मुठे, डाॅ. शुभांगी खेडकर, समद शेख
नारायण काळे, बंडोपंत हापसे, विशाल यादव, दत्तात्रय
जाधव, लखन उपाध्ये व अंगणवाडी सेविका, मदतनीस आदी