सागर भैय्या बेग यांच्यावरती राजकीय दबाव तंत्राचा वापर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव. अर्ज माघारी घेणार का ?
सागर भैय्या बेग यांच्यावरती राजकीय दबाव तंत्राचा वापर उमेदवारी मागे घेण्यासाठी दबाव. अर्ज माघारी घेणार का ?
*श्रीरामपूर(प्रतिनिधी) :- श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातून विद्यमान आमदार कानडेंना उमेदवारी नाकारून नवख्या ओगलेंना उमेदवारी देण्याची काँग्रेसने दाखवलेली हिम्मत व काँग्रेसने नाकारलेल्या कानडेंना अजित दादा पवारांच्या राष्ट्रवादी ने उमेदवारी देऊन दाखवलेली समय सूचकता या नाट्यमय घडामोडी मतदारांच्या पचनी पडलेल्या नाहीत.उमेदवारीच्या या पळवा पळवीत मात्र अपक्ष उमेदवार सागर बेग यांची क्रेझ मतदारांमध्ये वाढलेली जाणवत आहे.*
महिनाभर चालू असलेला उमेदवारी वाटपाचा काथ्या कुट राजकीय नेत्यांच्या नजरेतून जरी फायद्याचा असला तरी मतदार राजा मात्र या नौटंकीवर नाराज झालेला असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.निवडून आलेले पाच वर्षांनीच चमकले असे उघड बोलणारे मतदार वाढू लागल्याने मतदारांमधील नाराजी उघड होत आहे.राजकीय पक्षांमध्येच मेळ नसल्याने त्यांनी आमचा खेळ करू नये म्हणून ग्रामीण भागातील नाराज मतदार अपक्ष उमेदवार सागर बेग यांना पसंती देत त्यांच्या कार्यालयात त्यांच्या भेटी घेत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.मराठा आरक्षण,शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न, प्रभू श्रीरामांच्या नावाने असलेला श्रीरामपूर मतदार संघ हा जिल्हा व्हावा ही अनेक वर्षांची मागणी,युवकांचा रोजगाराचा प्रश्न असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी निवडणूक मैदनात उतरलेले सागर बेग यांचे हिंदू धर्माबाबतचे धर्मकार्य हे संपूर्ण राज्याने अनुभवलेले आहे.महंत रामगिरीजी महाराज यांच्या वक्तव्यावरून झालेले वादंग व महाराजांच्या समर्थनार्थ सागर बेग यांनी घेतलेल्या सभा हिंदूंना मोठ्या प्रमाणात दिलासा देणाऱ्या ठरलेल्या आहेत.मतदारसंघातील युवक वर्गात सागर बेग यांच्या उमेदवारीने नवचैतन्य संचारले असून युवकांनीच निवडणूक हाती घेतल्याचे चित्र बघावयास मिळत आहे .
परंतु राजकीय पक्षाचा दबाव तंत्राचा वापर करून सागर भैया बेग यांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव तंत्र वापर करण्यात येत आहे परंतु सागर भैया बेग या वरती काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे