प्राहार श्रीरामपूर विधानसभाच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेवरील खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा जाहीर निषेध ..!
प्राहार श्रीरामपूर विधानसभाच्या वतीने आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचेवरील खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याचा जाहीर निषेध ..!
आंतरराष्ट्रीय साहसीवीर खेळाडू शिवछत्रपती पुरस्कार विजेते तसेच श्रीरामपूर प्रहार जनशक्ती पक्ष विधानसभेचे अध्यक्ष सन्माननिय आप्पासाहेब ढुस यांना बदनाम करण्याच्या व त्यांची प्रभावी राजकीय घोडदौड थांबविण्यासाठी द्वेषापोटी ॲट्रॉसिटी सारख्या कायद्याचा गैरवापर होत असेल, तर ही संपुर्ण देशाच्या दृष्टीने निंदनीय बाब आहे. ज्या व्यक्तीने जीवाची पर्वा न करता देशासाठी हवेत चित्तथरारक खेळ खेळुन देशासाठी गोल्ड मेडल मिळविले. अशा व्यक्तीवर खोटे गुन्हे दाखल होत असेल तर ही बाब गांभीर्याने घेणे अत्यंत गरजेचे असल्याने श्रीरामपूर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करणायत आला आहे. आज (दि.१४) रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संदिप मिटके यांना प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले असून निवेदानात म्हटले आहे की, आमचा न्याय व्यवस्थेवर व पोलीस प्रशासनावर पुर्ण विश्वास असुन सदरील गुन्हयाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या वर्षोनुवर्षे प्रलंबित कामे सुटण्यास सुरुवात झाली. या झंझावाताचा फटका प्रस्थापितांना बसत असल्याने सूडबुद्धीने, सामाजिक तेढ निर्माण करून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या उद्देशाने, संरक्षणासाठी असलेल्या ॲट्रॉसिटीसारख्या कायद्याचा गैरवापर करून खोटा गुन्हा दाखल केला आहे. मात्र असे खोटे गुन्हे दाखल करून आम्ही समाजातील गोरगरीब जनतेच्या विकासासाठी उचलेला वसा अर्धवट सोडणारे नाही.
निवेदनात पुढे म्हटले आहे की, वास्तविकता ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यापूर्वी म्हणजेच दि.११ ऑक्टोबर रोजीच सदर इसमाने श्री. आप्पासाहेब ढुस यांच्या घरी जाऊन जीवे मारण्याची व ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन अरेरावी करून मारहाण करण्याचा प्रयत्न केला. त्याबाबत दि. ११ ऑक्टोबर रोजीच संध्याकाळी देवळाली पोलीस ठाण्यात श्री. ढुस यांनी रितसर तक्रार दाखल केलेली आहे. मात्र दि. १२ ऑक्टोबरच्या रात्री म्हणजे २४ तास उलटल्यानंतर सदर इसमाने श्री. आप्पासाहेब ढुस यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला. या मधल्या २४ तासात या इसमाला ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी कुठून खतपाणी मिळाले ही संशास्पद बाब असुन त्याचीही चौकशी व्हावी. अशी मागणी करण्यात आली आहे. न्यायदेवतेवर व पोलीस प्रशासनावर आमचा पूर्ण विश्वास असून पोलीस प्रशासन योग्य तो तपास करतील यात मुळीच शंका नाही. त्यामुळे तपासांती “दुध का दुध और पानी का पानी” ते स्पष्ट होईल. आमचे ह्रदय सम्राट, खंबीर नेतृत्व माजी मंत्री आदरणीय बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या आदेशानुसार व जिल्हाध्यक्ष अभिजीत दादा पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सामाजिक सेवेची अखंड ज्योत तेवतच राहणार…!
राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगले काम करणाऱ्या लोकांवर चिखल फेक आणि खोटे गुन्हे दाखल करून प्रतिमा मलीन करण्याचे काम होत असते असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर प्रहार जिल्हा कार्याधाक्ष नवाजभाई शेख, गोरखनाथ खडके, बाळासाहेब कराळे, श्रीरामपूर तालुका कार्याध्यक्ष नानासाहेब तागड, विजय कुमावत, राजेंद्र चौधरी, जगन्नाथ शिरसाठ अशोक साप्ते आदींच्या सह्या आहेत.