जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संघटनेच्या सदस्यपदी टाकळीभान येथील किरण धुमाळ व अल्ताफ शेख यांची निवड…

जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या संघटनेच्या सदस्यपदी टाकळीभान येथील किरण धुमाळ व अल्ताफ शेख यांची निवड…
कबड्डी खेळाचे माहेरघर म्हणून ओळखले जाणारे टाकळीभान येथील कबड्डी खेळाचे तज्ञ मार्गदर्शक, व गावातील अनेक राज्य व देश पातळीवरील कबड्डी खेळाडू घडविणारे, व युवकांना कबड्डी खेळाचे सखोल मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणारे टाकळीभानचे भूमिपुत्र श्री किरणराव धुमाळ, श्री अल्ताफ मेजर शेख यांची जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली. श्रीरामपूर येथील काँग्रेस भवन या ठिकाणी बॅरिस्टर रामराव आदिक सभागृहात नुकत्याच या निवडी पार पडल्या, यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे नूतन अध्यक्ष श्री अविनाशजी आदिक, शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलास बापू कोते,आबासाहेब थोरात, कैलास बोर्डे, हंसराज आदिक, सुनील थोरात ,जयंत चौधरी, जिल्हा कबड्डी असोसिएशनचे जिल्हा उपाध्यक्ष सचिन पवार आदी या निवडी प्रसंगी उपस्थित होते. टाकळीभान व परिसरास कबड्डी खेळाची आवड असल्याने येथे कबड्डी या खेळाचा मोठा चाहता वर्ग आहे, व येथील भूमीने अनेक दर्जेदार व उत्कृष्ट खेळाडू घडविले आहेत, कबड्डी खेळाचे अनेक खेळाडू ,विद्यार्थी शासकीय सेवेतील पोलीस ,आर्मी मध्ये व विविध उच्च पदावर गेलेले आहेत, त्यामुळे या कबड्डी खेळाबद्दल गावास वेगळी आस्था व कुतूहल आहे.या निवडीबद्दल टाकळीभान येथील सर्व पदाधिकारी, मान्यवर, सरपंच उपसरपंच, ग्रामस्थांच्यावतीने, कबड्डी, क्रीडा प्रेमींच्या वतीने टाकळीभानच्या या किरण धुमाळ व अल्ताफ शेख या नूतन नवनिर्वाचित सदस्यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले. व या योग्य निवडीबद्दल समस्त ग्रामस्थ व कबड्डी क्रीडा प्रेमींच्या वतीने कबड्डी असोसिएशनचे आभार व्यक्त करण्यात आले.