किराणा दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई*

*गेवराईत किराणा दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची कारवाई*
*सुट्टे पामतेल विक्री केले जात होते ; कारवाईने खळबळ*
गेवराई मोंढा येथील एका किराणा दुकान मध्ये सुट्टे पाम तेल विक्री करत असल्याचे अन्न प्रशासन सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांना कळाले असता त्यांनी त्यांच्या सहकार्यासह शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास शहरातील मोंढा भागात प्रसिद्ध दुकानात धाड टाकत मोठी कारवाई केली. या कारवाईने सुट्टे पामतेल विक्री करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
दिपावली निमित्त मोठ्या प्रमाणात तेलाचे विक्री केली जाते. परंतू सुट्टे तेल विक्री न करण्याचे आदेश असतांना देखील जास्त पैसै व तेलात मिलावट करण्याच्या लालचेने दुकानदार सुट्टे तेल विक्री करत असतात. नागरिकांच्या आरोग्याचा विचार न करता सरास सुट्टे तेल विक्री करत आहेत. अशाचप्रकारे येथील मोंढा भागात दि. 14 शुक्रवार रोजी सायंकाळी 9 च्या सुमारास एका किराणा दुकानात सुट्टे पामतेल विक्री होत असल्याची माहिती मिळताच अन्न व भेसळ अधिकार्यांनी मोठी कारवाई केली. या कारवाई मध्ये सुट्टे पाम तेल 1500 कि.ग्रा. व सोयबिन तेल 500 कि.ग्रा. सील केले असुन या मध्ये 2 लाख 32 हजार 500 रुपयाचे तेल सील केले. दरम्यान तपासनीसाठी नमुना तेल पाठवण्यात आले असल्याची माहिती अन्नप्रशासन साहय्याक आयुक्त सय्यद इम्रान हाशमी यांनी दिली. या कार्यवाहीमध्ये अन्नसुरक्षा अधिकारी महेंद्र गायकवाड, नमुना साहय्यक उमेश कांबळे, भास्कर घोडके आदींनी केली.