एका महीलेने पकडला साडेचार फुट अति विषारी नाग
एका महीलेने पकडला साडेचार फुट अति विषारी नाग
बेलापुर (प्रतिनिधी )-येथील सर्पमैत्रीण राजश्री निलेश अमोलीक हिने साडे चार फुट काळ्या रंगाचा अति विषारी नाग पकडून त्यास पुन्हा निसर्गाच्या सानिध्यात सोडून दिले असुन भल्या भल्यांना धडकी भरविणाऱ्या नागास एका महीलेने पकडलेले पाहुन अनेकांनी तोंडात बोटे घातली बेलापुर येथील पत्रकार देविदास देसाई संक्रापुर तालुका राहुरी येथील शेतीत चक्कर मरण्यासाठी गेले असता शेतीची देखभाल करणाऱ्या आनंदा बर्डे याच्या समोरच अचानक एक काळ्या रंगाचा नाग गेला . त्यानंतर तो नाग जवळील शेडमध्ये असलेल्या जुन्या पाईपच्या ढिगात घुसला पत्रकार देसाई यांनी तातडीने बेलापुर येथील सर्प मित्र जयेश अमोलीक यांचेशी संपर्क साधला अवघ्या काही वेळातच जयेश आमोलीक व राजश्री अमोलीक हे संक्रापुर येथे पोहोचले त्यांनी तातडीने ज्या ठिकाणी नाग बसला होता ते ठिकाण पाहीले ग्रामस्थांच्या मदतीने तेथील अडचण बाजुला करत असतानाच नाग एका पाईपमध्ये असल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने त्यास पिशवीत जेरबंद केले साप विषारी असो अगर बिनविषारी त्यास मारु नका तो शेतकऱ्यांचा मिंत्र आहे निसर्गाचे चक्र व्यवस्थित ठेवायचे असेल तर सापाला मारु नका आमच्या सारख्या सर्प मित्राला बोलवा आम्ही त्याला पकडून पुन्हा निसर्गाच्या हवाली करतो विषारी साप चावल्येल्या व्यक्तीस तातडीने दवाखान्यात न्या अंगारे धुपारे करु नका अंगारे धुपाऱ्यांने विष उतरते ही केवळ अंधश्रद्धा आहे कुणाच्या शेतात घरात साप आढळल्यास मारु नका मला 9172110991 किंवा 9730803069 या फोन नंबरवर फोन करा सापाला जिवदान द्या साप कुणावरही हल्ला करत नाही आपल्य बचावासाठी केवळ तो हल्ला करत असतो त्यामुळे त्याला मारु नका असे अवाहनही राजश्री अमोलीक व जयेश अमोलीक यांनी केले आहे