खिर्डी गावामध्ये विकासाला गती एक वर्षाच्या आत अर्धा कोटीच्या वर कामे- सरपंच सौ कांबळे
खिर्डी गावामध्ये विकासाला गती एक वर्षाच्या आत अर्धा कोटीच्या वर कामे- सरपंच सौ कांबळे
श्रीरामपूर तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या खिर्डी गावामध्ये सरपंच सौ कांबळे यांनी सूत्रे हातात घेऊन एक वर्ष ही पूर्ण झाले नाही.तेच गावांमधील नागरिकांच्या समस्या समजून महत्त्वाचे पाणी, रस्ते, शाळा याकडे प्रामुख्याने लक्ष घातल्याने विकास कामांना गती देत अर्ध्या कोटीच्या वर कामे मार्गी लावले. तसेच अर्धा कोटीच्या वर कामांना मंजुरी मिळवलेली असून, कामे प्रगतीपथावर आहेत. गावांमधील रस्ते हे पावसाळ्यामध्ये जास्त प्रमाणावर खराब होत असल्याचे लक्षात ठेवून सरपंच सौ कांबळे यांनी खिर्डी कमानी मध्ये काँक्रिटीकरण करून घेतले आहे. तसेच पंधरावा वित्त आयोगातून बंदिस्त गटार व गावठाण मध्ये बंदिस्त गटार बांधकाम करण्यात आले आहे. आमदार लहू कानडे यांच्या निधीतून 30 लाख रुपये किमतीची विटनोर वस्ती, खिर्डी ते कांबळे वस्ती तसेच जाधव वस्ती खडीकरण व मजबुतीकरण रस्ते देखील मंजूर करून आणण्यात आले. त्यातील काही कामे प्रगती पथावर आहे. जलजीवन मिशन योजने अंतर्गत चे काम अंतिम टप्प्याचा असून लवकरच योजना चालू होणार आहे. पावसाळ्यामध्ये शाळेमध्ये मुलांना चिखल व पाण्याचा त्रास होऊ नये म्हणून शाळेसमोर ब्लॉक बसवण्यात आले आहेत. तसेच जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती व शाळेमध्ये नवीन शौचालय बांधण्यात आले आहे. हनुमान मंदिर व शाळे जवळील कमानीमध्ये वेशी मध्ये काँक्रिटीकरण देखील करण्यात आले. गावातील कांबळे वस्ती येथे स्टेट लाईट बसवण्यात आले असून सन 2024 25 या आर्थिक वर्षामध्ये 41 घरकुले मंजूर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे खिर्डी पाचेगाव हा रस्ता अनेक दिवसापासून खड्ड्यात गेला आहे. नेवासा व श्रीरामपूर तालुक्याला ग्रामीण भागातून जोडणारा रस्ताच राहिलेला नसल्याने खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना या रस्त्याची परिस्थिती समजून या रस्त्याच्या पाठपुरावा देखील अंतिम टप्प्यात असल्याचे सौ कांबळे यांनी सांगितले. पंचवीस वर्षापासुन न भरणारे गाव तळे भरले, गावाला पाणी वापरण्याचे पाणी तसेच जनावरे पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तळे खोलीकरण करण्याचा विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून 26 लक्ष रुपये तळे खोलीकरण करण्यासाठी मंजूर करण्यात आले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार असल्याचे सांगितले.
अवघ्या काही महिने झालेल्या सरपंच यांनी जिद्द व काम करण्याच्या इच्छाशक्तीने हे दाखवून दिले की गावाच्या विकास करण्यासाठी सुज्ञ व्यक्ती सरपंच पदावर असल्यास गावाचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही हे खिर्डी ग्रामपंचायत सरपंच सौ सुनीता कांबळे यांनी दाखवून दिले.