संस्थेच्या चार मजली इमारतीला मध्यरात्री विजेच्या शाॕटसर्किटमुळे आग लागून सुमारे पाच कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे नुकसान झाल्याचा अंदाज
संस्थेच्या चार मजली इमारतीला मध्यरात्री विजेच्या शाॕटसर्किटमुळे आग लागून सुमारे पाच कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे नुकसान झाल्याचा अंदाज
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील कै.बाबा नजु राहिंज विविध सहकारी सेवा संस्थेच्या चार मजली इमारतीला मध्यरात्री विजेच्या शाॕटसर्किटमुळे आग लागून संस्थेच्या इमारती मध्ये तर असणाऱ्या किराणा दुकान, अर्बन को.आॕफ.बॕक, एस.डी.फिटनेस जिम यासह इमारतीचे असे सर्व मिळून सुमारे पाच कोटी पेक्षा जास्त रक्कमेचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होतोय. पोलिस पंचनामा झाल्यानंतर अधिकृत माहिती पुढे येईल.
सविस्तर माहिती अशी कि रविवार दि.१० रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कै.बाबा नजु राहिंज संस्थेच्या इमारती मध्ये पोपटशेठ मुनोत ( पी.एल.एम )या नावाने गावात सर्वात मोठे होलसेल किराणा दुकान आहे. यामध्ये रात्री विजेच्या शाॕटसर्कीटमुळे आग लागल्याचे निदर्शनास आल्यानंतर मालक राजेंद्र मुनोत,संजय मुनोत यांनी घटनास्थळी धाव घेऊन पहाणी केली असता तोपर्यंत आगीने काही वेळातच आगीने मोठे उग्ररुप धारण करुण सर्व इमारतीने पेट घेतला यावेळी नागवडे सहकारी कारखाना, श्रीगोंदा नगरपालिका, दौंड नगर पालिका, कुरकुंभ एमआयडीसी येथील अग्नीशामक दलाचे बंब बोलावून रात्री बारा ते पहाटे पाचपर्यत पाच तासांच्या अथक प्रयत्नांने आग आटोक्यात आली. या आगी मध्ये मुनोत यांच्या तळघरातील व पहिल्या मजल्यावरील किराणा दुकानातील तेल व तुप डबे, तसेच गुळ,डाळ यांच्यासह इतर वस्तु आगी जळून खाक झाल्या आहेत. ह्याच इमारती मध्ये किराणा दुकानातील आगीमुळे दुसऱ्या मजल्यावर असणाऱ्या नगर अर्बन को.आॕफ.बॕक याचे संपूर्ण फर्निचर,काॕम्प्युटर, कागदपत्रे, इनव्हेटर बॕटऱ्या जळून गेल्या आहेत. पण बॕकेचे लाॕकर याला सुध्दा आगीची झळ मोठी बसल्यामुळे दोन दिवसांनी सर्व खातेदार, यांना बोलावू सर्वाच्या समोर पंचनामा करुण लाॕकर खोलणार आहे. यामध्ये अनेकांचे सोने, व रोख रक्कम आहे. त्यामुळे नुकसानीचा अंदाज वाढणार आहे. तिसऱ्या मजल्यावर एस.डी.फिटनेस हि तरुणांच्यासाठी व्यायामाची जिम आहे. तेथेही आगीमुळे एक महिन्यापूर्वी आणलेले नवीन व्यायामाचे साहित्य जळून गेल्याने तेथे ५० ते ६० लाखाचे नुकसान झाले आहे. जेव्हा किराणा दुकानाला आग लागली तेव्हा दुकानात मोठ्या प्रमाणात म्हणजे दिड ते दोन हजार तेल डबे असल्याने आगी मध्ये तेल डबे व सिलेंडर गॕस फुटल्याने मोठी आग वाढली ति विझविण्यासाठी अग्नीशामक दलाच्या जवानांना पाच ते सहा तास प्रयत्न करावे लागले. या लागलेल्या आगीमुळे राहिंज संस्थेची संपूर्ण इमारत जळाल्याने इमारतीचे सुमारे तीस लाखापर्यत चे नुकसान होवून संपूर्ण इमारत आता कमकुवत झाल्याने आगीच्या उष्णतेमुळे इमारतीचा स्लॕब कोसळत आहे. ह्याच आगीने भोवतालच्या इमारतीनां झळ पोहचून तेथील इमारतीचे दारे,खिडक्या आगीने जळाल्या आहेत. या संपूर्ण आगी मध्ये सुमारे पाच कोटी रुपये पर्यत नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सकाळी दहा वाजता आमदार बबनराव पाचपुते, अर्बन बॕकेचे अध्यक्ष राजेंद्र अगरवाल, संचालक अनिल कोठारी, शैलेश मुनोत, कैलासराव पाचपुते, राहिंज संस्थेचे अध्यक्ष बबनराव राहिंज, उपाध्यक्ष गोरख पाचपुते, विठ्ठलराव काकडे, व्यवस्थापक राजेंद्र रोकडे, एम.पी.साळवे, शाखा अधिकारी श्रीकांत शेळके, राकेश पाचपुते, बंडू जगताप, सतिष कुतवळ, यांच्यासह विविध क्षेत्रातील व्यक्तीनी दिवसभर घटनास्थळी येवून भेटी देवून पहाणी केली.श्रीगोंदा पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पोलिस पंचनामा करुण पुढील तपास सुरु आहे.